आश्चर्यच! जीव वाचविण्यासाठी चक्क ट्रेनखालीच झोपली महिला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

हल्ली ट्रेनच्या दुर्घटनेबाबत अनेक बातम्या आपल्याला बघायला मिळतात. पण हरियाणात एक वेगळीच घटना घडली आहे. एका महिलेने स्वत: चा जीव वाचविण्यासाठी चक्क पटरीवरच झोपण्याचे धाडस दाखविले आहे. 

हरीयाणा: हल्ली ट्रेनच्या दुर्घटनेबाबत अनेक बातम्या आपल्याला बघायला मिळतात. पण हरियाणात एक वेगळीच घटना घडली आहे. एका महिलेने स्वत: चा जीव वाचविण्यासाठी चक्क पटरीवरच झोपण्याचे धाडस दाखविले आहे. 

हरियाणाच्या रोहतक येथे रेल्वे रुळ ओलांडतांना एक महिला ट्रॅकवर पडते. आणि याच दरम्यान ट्रॅकवरून ट्रेन येत असते. अशात आपले प्राण वाचविण्यासाठी त्या महिलेने चक्क रेल्वे ट्रॅक वर झोपून आपले प्राण वाचवले.  सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडियावर जोरदार टिप्पण्यासुद्धा दिल्या जात आहेत.

राखी सय्यना असे या महिलेचे नाव आहे. राखी सय्यनाला कोणी मारू शकत नाही, अशा प्रकारच्या कमेंट सोशल मिडियावर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला धावत्या रेल्वेखाली अडकली, त्यानंतर तीने रेल्वे रुळावर पडून स्वत:चे प्राण वाचवले.  सिग्नलच्या प्रतिक्षेत ट्रेन ट्रॅकवर उभी होती मिळालेल्या माहितीनुसार महिलेने ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करताच ट्रेन चालू झाली. ती महिला रुळावर पडली आणि संपूर्ण ट्रेन तिच्यावरुन गेली. या घटनेतील महिला पूर्णपणे सुरक्षित आहे. दरम्यान या तिच्या शहाणपणाची आणि धैर्याची स्तुती सोशल मिडियावर होत आहे.

संबंधित बातम्या