Bihar: गरोदर महिलेची धावत्या ट्रेनमध्ये प्रसूती, सर्वांनी केले दुर्लक्ष मग तृतीयपंथी आले मदतीला

असह्य वेदनेने ती ओरडत होती. यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणारे प्रवासी कोणी तिच्या भेटीला आले नाही. महिलेचा पतीही हतबल झाला.
BIhar
BIhar Dainik Gomantak

तृतीयपंथी लोकांबद्दल एक समज असा आहे की ते गैरवर्तन करतात आणि लोकांकडून पैसे उकळतात. मात्र याच्या उलट बिहारच्या जमुईमधून एक सकारात्मक घटना समोर आली आहे. येथे जमुई जिल्ह्यातील झाझा-जसीदिह रेल्वे सेक्शनवर ट्रेनमध्ये प्रवास करणारी एक महिला प्रसूतीच्या वेदनांनी हैराण झाली होती.

असह्य वेदनेने ती ओरडत होती. यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणारे प्रवासी कोणी तिच्या भेटीला आले नाही. महिलेचा पतीही हतबल झाला.

BIhar
Watch Video: दुचाकीने वृद्ध व्यक्तीला रस्त्यावरून फरफटत नेले, थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

ट्रेनमध्ये लोकांकडून पैसे मागण्यासाठी आलेल्या तृतीयपंथी टोळक्याने महिलेला वेदनेने ओरडताना पाहिले असता त्यांनी महिलेची ट्रेनमध्येच प्रसूती केली. प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत.पटना जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखपुरा जिल्ह्यातील एक महिला प्रवासी हावडा-पाटणा जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसून हावडाहून लखीसरायला जात होती. ट्रेन नुकतीच जसिडीहला पोहोचली तेव्हा महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर महिलेने वेदनेने ओरडू लागली.

BIhar
Egg Shortage In Maharashtra: महाराष्ट्रावर 'अंडी' संकट, दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा

यावेळी ट्रेनमध्ये अनेक महिलाही प्रवास करत होत्या, मात्र वेदनांनी त्रस्त महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. यादरम्यान तृतीयपंथींचा एक गट पैसे मागत तेथे पोहोचला. तोपर्यंत ट्रेन जमुईच्या सिमुलतला रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली होती.

महिलेला वेदनेने ओरडताना पाहून तृतीयपंथी यांनी क्षणाचाही विलंब न लावता महिलेला ट्रेनच्या बाथरूममध्ये नेले आणि महिलेची प्रसूती केले. महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे.

सुखरूप प्रसूतीनंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे तृतीयपंथी यांनी महिलेच्या पतीकडे पैसे आहेत का, अशी विचारणा देखील केली. तसेच महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी पैशांची गरज भासल्यास मदतही करेल. असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com