....आणि महिलेने घातला 13 जणांना गंडा

नववधूला पोलिसांनी टाकले तुरुंगात
women from Rajasthan bluff 13 people
women from Rajasthan bluff 13 peopleDainik Gomantak

राजस्थानमध्ये लग्नाच्या नावाखाली लुटमारीच्या घटना वाढत आहेत. आतापर्यंत 13 तरुणांना आपला बळी बनवणाऱ्या अशाच एका महिलेला बाडमेर पोलिसांनी अटक केली आहे. लग्न झाल्यानंतर ही महिला लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार होत असे.

पोलिसांनी (police) सांगितले की, ही महिला कुमारी, विधवा आणि घटस्फोटित असल्याचे भासवून लोकांना फसवायची आणि त्यांना लुटून पळून जायची. आता या नववधूला पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. बारमेर जिल्ह्यातील चौहान शहरातील ईश्वरपुरा कपराऊ येथे राहणारी 38 वर्षीय जिओदेवी, कुमारी असल्याचे भासवून लोकांशी लग्न करते आणि नंतर त्यांना लुटून पळून जाते.

women from Rajasthan bluff 13 people
रेल्वे स्टेशनवरच महिलेची पोलिसाला चपलेने मारहाण, व्हिडीओ व्हायरल

वृत्तानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये महिला लोकांना ब्लॅकमेल करून त्यांना फसवते असे आढळून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओदेवीवर चौहाटण पोलीस ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

आरोपी (accused) महिला लोकांना आपल्या जाळ्यात अडकवते, नंतर त्यांना लुटते आणि नंतर पुन्हा नवीन लग्न करते. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आरोपी जिओदेवीला अटक करून न्यायालयात (court) हजर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com