धक्कादायक..!; फरीदाबादमध्ये भरदिवसा तरूणीची गोळी घालून हत्या

धक्कादायक..!; फरीदाबादमध्ये भरदिवसा तरूणीची गोळी घालून हत्या
faridabad

चंदीगढ- हरियाणाच्या फरीदाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून एका २१ वर्षीय तरूणीची भरदिवसा गोळी घालून हत्या करण्यात आली. बल्लबगढमधील एका महाविद्यालयाच्या बाहेर ही घटना घडली. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने सर्वत्र व्हायरल होत आहे.    

या घटनेच्या आधी तरुणी आपल्या मैत्रिणीसह महाविद्यालयातून बाहेर आली होती. वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा असल्याने ती महाविद्यालयात आली होती. याच दरम्यान हल्लेखोर एका कारमधून तेथे दाखल झाले. दोघेही हल्लेखोरांनी तिला मैत्रिणीपासून अलग करत जबरदस्ती करून तिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरूणीने नकार दिल्याने तिच्या डोक्यात गोळी घालून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. बल्लबगढचे सहआयुक्त जयवीर सिंग राठी यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.  

दरम्यान, याप्रकरणी दोनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तौसिफ असे या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. तो तरुणीच्या परिचयाचा असून प्रेम प्रकरणातून ही घटना झाल्याची चर्चा आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये हरियाणातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हरियाणातील एका सुधारगृहातून काही बालगुन्हेगार पसार झाले होते. तर हरियाणाच्या झज्जारमध्ये पाच जणांच्या टोळीने बँकेवर सशस्त्र दरोडा टाकत सात लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com