भारतातील 'या'' मुख्यमंत्र्यांच्या कामाची 'युनायटेड नेशन्स' ने घेतली दखल

patnayak.jpg
patnayak.jpg

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचं  युनायटेड नेशन्सने (United Nations) कौतुक केले आहे. नैसर्गिक आपत्तीदरम्यान उत्तम काम करत असल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. आपत्तीदरम्यान उत्तम यंत्रणा उभारणारे मुख्यमंत्री पटनायक असून त्यांनी नैसर्गिक आपत्तीदरम्यान अनेकांचे प्राण वाचवल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. (The work of the Chief Minister of India has been taken up by the United Nations)

पटनायक यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मामी मिझुतोरी (Mami Mizutori) यांनी मुख्यमंत्री पटनायक यांचं कौतुक केले आहे. मामी मिझुतोरी संयुक्त राष्ट्र संघाच्या आपत्कालीन कालावधीमध्ये कमीत कमी नुकसान व्हाव यासाठीच्या समितीच्या प्रमुख आहेत. आपत्ती दरम्यान कारभार कसा हाताळावा तसेच आपत्कालीन व्यवस्था उभारण्यासाठी गुंतवणूक कशी करावी यासंदर्भातील आदर्श घालून दिलं असल्याचे म्हटले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात ओडिशाने पूर्वीपेक्षा अधिक चांगली तयारी केली आहे. आणि ते यासंदर्भात उत्तम पध्दतीने व्यवस्थापन करु शकतात असंही मिझुतोरी यांनी म्हटले आहे. मागील आठवड्यामध्ये आलेल्या यास वादळामुळे ओडिशातील सात लाख नागरिकांचं यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आलं होतं.

मिझुतोरी यांनी म्हटले की, ''आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी उत्तम यंत्रणा उभारण्यासाठी मुख्यमंत्री पटनायक यांनी राजकीय इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे दाखवून दिले आहे. 1999 साली नैसर्गिक आपत्तीदरम्यान ओडिशामध्ये समुद्रकिनारी राहणाऱ्या 10 हजार जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे एवढे मृत्यू कधीच झाले नाहीत,'' असंही त्यांनी म्हटले आहे. 2013 मध्ये ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलेल्या फिलीन वादळानंतरही संयुक्त राष्ट्रांनी पटनायक यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पाहणी शुक्रवारी केली. तेव्हा येणाऱ्या वादळामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर दिर्घकालीन तोडगा काढण्याची आणि आपत्कालीन यंत्रणेची तरतूद करण्याची मागणी ओडिशा सरकारच्यावतीने करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com