जागतिक अल्झायमर दिन: चला, स्मृतिभ्रंशावर बोलूया

एएनआय
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

अल्झायमर आणि डिमेन्शिया (स्‍मृतिभ्रंश) या आजारांच्या जनजागृतीसाठी २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन पाळला जातो. या आजाराचे गांभीर्य जनमानसापर्यंत पोचविण्यासाठी हा दिवस साजरा होतो. काही देशांमध्‍ये तर महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा लॉकडाउनच्या काळात आलेल्या या दिनाची संकल्पना ‘चला, स्मृतिभ्रंशावर बोलूया’ अशी आहे.

नवी दिल्ली:  अल्झायमर आणि डिमेन्शिया (स्‍मृतिभ्रंश) या आजारांच्या जनजागृतीसाठी २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन पाळला जातो. या आजाराचे गांभीर्य जनमानसापर्यंत पोचविण्यासाठी हा दिवस साजरा होतो. काही देशांमध्‍ये तर महिनाभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा लॉकडाउनच्या काळात आलेल्या या दिनाची संकल्पना ‘चला, स्मृतिभ्रंशावर बोलूया’ अशी आहे.

गुरुग्राममधील पारस रुग्णालयाच्या मज्जातंतूशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रजनीश कुमार म्हणाले, ‘‘यंदाची  संकल्पना स्मृतिभ्रंशावर आधारित असल्याने या आजारासंबंधी लोकांनी समजून घेणे आवश्‍यक आहे आणि त्यावर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे.’’ ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकातील  अभ्यासलेखात स्मृतिभ्रंशाच्या आयुष्यावरील  धोकादायक परिणामांवर लेख आहे. यात शिक्षण, अतिताण, बहिरेपणा, स्थूलत्व, धूम्रपान, नैराश्‍य, शारीरिक कमजोरी, मधुमेह आणि सामाजिक विलगीकरण यांना सामोरे जावे लागते. वैयक्तिक पातळीवर अशा व्यक्तींची काळजी घेताना कुटुंबाचे सहकार्य, सुरक्षा, भविष्यातील नियोजन आवश्‍यक असते.

अल्झायमर बरा करणाऱ्या उपचार पद्धतीची आपल्याला गरज आहे, असे त्यांनी आग्रहाने नमूद केले.

कोरोना काळात अधिक काळजी घ्या
स्मृतिभ्रंशाने पीडित असलेल्या ज्येष्ठांसाठी लॉकडाउनचा काळ हा अधिक कष्टदायी ठरत आहे. अशा वेळी जर तुमच्या कुटुंबात किंवा शेजारी स्मृतिभ्रंशाचा रुग्ण असेल तर त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. अशा रुग्णांची काळजी घेणारी केंद्रे, संस्था लॉकडाउनच्या काळात उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांची अवस्था बिकट होते. यावर उपाय म्हणजे मदत गटांशी व्हिडिओ किंवा कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून त्यांचा सल्ला घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे संस्थापक संचालक डॉ. सुचिन बजाज यांनी सांगितले.

अशी घ्यावी काळजी

  •  अपराधीपणाची 
  • भावना मनातून काढणे
  • लवकर तपासणी 
  • करून निदान करणे
  • रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांच्या गरजांकडे लक्ष देणे
  • अल्झायमरच्या आजारावर चर्चा
     

संबंधित बातम्या