Army Day: लोंगेवाला येथे फडकणार जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा

हा तिरंगा 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद असून त्याचे वजन 1400 किलो आहे.
Army Day: लोंगेवाला येथे फडकणार जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा
National flag of IndiaDainik Gomantak

आज लष्कर दिनानिमित्त (Army Day), राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान(India-Pakistan) सीमेवर खादीचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' (National flag) फडकवला जाणार आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचे मुख्य केंद्र असलेल्या लोंगेवाला येथे हा तिरंगा प्रदर्शित केला जाणार आहे.

तिरंगा 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद आहे

हा तिरंगा 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद असून त्याचे वजन 1400 किलो आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागिरांना 49 दिवस लागले. या राष्ट्रध्वजाला तयार करण्यासाठी खादी कारागीर आणि कामगारांना अतिरिक्त 3500 तास काम मिळाले आहे. एकूण 33,750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा ध्वज तयार करण्यासाठी 4500 मीटर हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या खादी सूती ध्वजस्तंभाचा वापर करण्यात आला आहे. ध्वजातील अशोक चक्राचा व्यास 30 फूट आहे.

 National flag of India
CDS बिपीन रावत : हेलिकॉप्टर अपघाताचे चौकशीत सत्य आले समोर

खादीचा हा 5 वा तिरंगा फडकवण्यात येणार आहे

2 ऑक्टोबर 2021 रोजी लेहमध्ये तिरंग्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर खादी संस्थांनद्वारा सार्वजनिक प्रदर्शनासाठी बनवलेला हा 5वा ध्वज आहे. दुसरा तिरंगा वायुसेना दिनानिमित्त 8 ऑक्टोबर 2021 रोजी हिंडन एअरबेसवर आणि 21 ऑक्टोबर 2021 रोजी लाल किल्ल्यावर प्रदर्शित करण्यात आला. त्याच दिवशी, भारतात 100 कोटी लसीकरण डोस पूर्ण झाले होते. 4 डिसेंबर 2021 रोजी नौदल दिन साजरा करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नेव्हल डॉकयार्डमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता.

 National flag of India
पहिला रिमोट सेन्सिंग उपग्रह 'भास्कर-1'; अन् अवकाशात दिसला भारताचा रुबाब

तिरंगा हा भारतीयतेच्या सामूहिक भावनेचे आणि खादी कलाकुसरीच्या वारशाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सवा'अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा तिरंगा तयार केला आहे. ऐतिहासिक प्रसंगी प्रमुख ठिकाणी ध्वज प्रदर्शित करण्यासाठी या ध्वजाला सुरक्षा दलांकडे सोपवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com