World Press Freedom Day: लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला निर्भीडपणे तोलून धरा

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

जगातील सर्व सरकारे, सत्ताधारी तसेच राजे यांना पत्रकारिता स्वातंत्र्याचे महत्व नेहमी लक्षात राहावे म्हणून प्रत्येक वर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस हा 3 मे ला साजरा केला जातो.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता होय. नागरिक आणि सरकार यांना जोडणारा पत्रकार एक दुवाच आहे. जगातील सर्व सरकारे, सत्ताधारी तसेच राजे यांना पत्रकारिता स्वातंत्र्याचे महत्व नेहमी लक्षात राहावे म्हणून प्रत्येक वर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस हा 3 मे ला साजरा केला जातो. (World Press Freedom Day journalist is one who connects citizens and government)

1991 मध्ये आफ्रिकेतील पत्रकारानी,  स्वातंत्र्य लढ्यासाठी पुढाकार घेऊन एक मोहिमेला सुरुवात केली. 3 मे 1991 मध्ये नामेबियाची राजधानी विंडहोक येथे पत्रकरांची परिषद भरवली होती. यामध्ये पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर 1992 सालापासून 3मे  रोजी हा दिवस  'जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस'  म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.  1993 मध्ये यूनेस्कोने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

निवडणूका संपल्या; आता देशात 15 दिवसासाठी राष्ट्रीय लॉकडाउन?

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एक थीम ठेवली जाते. यंदाची थीम ही  माहितीतून जनकल्याण (Information as a Public Good) अशी आहे. या दिवशी यूनेस्कोचे महासंचालकानी जगभरातील सरकाराना निश:शुल्क, निष्पक्ष आणि विविधपूर्ण माध्यमांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच अनेक देशातील पत्रकार आणि माध्यम व्यक्तीना आपले कर्तव्य बजावत असताना निर्बंध, छळ, अटक आणि मृत्यूचा धोका सहन करावा लागतो. पत्रकारांनी  त्यांचे काम निर्भीडपणे करावे याचे स्मरण जागतिक प्रेस डे करून देतो.

मृत्यूचे तांडव संपेना! कर्नाटकात ऑक्सिजनअभवी पुन्हा 24 रुग्णांचा मृत्यू 

यूनेस्कोने यावर्षी इथोपीयची राजधानी आदिस आबाबा  येथे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन निमित्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. योनेस्को च्या महासंचालकद्वारे जगभरातील माध्यमांच्या स्वातंत्र्य साठी लढणाऱ्या पत्रकारांना 'गुलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रिडम प्राईज' असा यूनेस्कोचा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे.    

संबंधित बातम्या