जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमचे नाव बदलण्यात आले असून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार आहे. 

अहमदाबाद: जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमचे नाव बदलण्यात आले असून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार आहे. गुजरातमधील मोटेरा स्टेडीयमला देण्यत आलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून आता या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. स्टेडियमचं नामकरण करुन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद’ असं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आजपासून या मैदानावर भारत- इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे.

केंद्र सरकारचे न्यायव्यवस्थेवर नियंत्रण; राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

अहमदाबादमधील मोटेरा मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी एकदम जय्यत तयारी करण्यात आली आहे. सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा या कार्यक्रमला उपस्थित होते.    

 

संबंधित बातम्या