Morbi Bridge Collapse: मोरबी दुर्घटनेवर चीनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची प्रतिक्रीया, म्हणाले...

Morbi Bridge Collapse: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुजरातमधील मोरबीत पूल कोसळून झालेल्या 135 जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Xi Jinping
Xi JinpingDainik Gomantak

Morbi Bridge Collapse: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुजरातमधील मोरबीत पूल कोसळून झालेल्या 135 जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या शोकसंदेशात ते म्हणाले की, 'ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे.' चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या संदेशात या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, "चीनी सरकार आणि चीनी नागरिकांच्या वतीने जिनपिंग यांनी मोरबीतील मृतकांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयप्रती माझ्या संवदेना आहेत." त्याच दिवशी चीनचे (China) पंतप्रधान ली किंग यांनी देखील पंतप्रधान मोदींना शोकसंदेश पाठवला.

Xi Jinping
Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी प्रकरणात 9 जण गजाआड, जाणून घ्या

दरम्यान, चीनचे स्टेट कौन्सिलर आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी त्यांचे भारतीय समकक्ष एस जयशंकर (S Jaishankar) यांना मोरबी येथील घटनेबद्दल शोकसंदेश पाठवला आहे. वांग यांनी या दुर्घटनेतील मृतकांप्रती शोक व्यक्त केला. पीडित आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली.

Xi Jinping
Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबाबत PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पीएम मोदींनी घेतली जखमींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी मोरबी येथील पूल अपघात स्थळाला भेट दिली. तिथे सुरु असलेल्या शोध आणि बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधानांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींचीही भेट घेतली. अपघातानंतरच्या मदतकार्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. रविवारी मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने 135 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांनी परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. हा पूल दरबारगड पॅलेसला स्वामीनारायण मंदिराशी जोडतो. पंतप्रधान दरबारगड पॅलेसमध्ये पोहोचले, जिथे अधिकाऱ्यांनी त्यांना अपघात आणि पूल कोसळण्याच्या संभाव्य कारणांची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com