वयाच्या 24 व्या वर्षी 23 कोटींचे पॅकेज, असा मिळाला 'यशवंतला' मल्टी नॅशनल कंपनीमध्ये जॉब

बर्लिन जर्मनीतील टेस्ला गिगा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी यशवंतची निवड झाली.
Yashwant Chaudhary
Yashwant ChaudharyTwitter

चंपावत: उत्तराखंडमधील चंपावतचा (Champawat) यशवंत चौधरी (Yashwant Chaudhary) अवघ्या 24 वर्षांचा आहे. पण इतक्या लहान वयात त्याला 23 कोटींच्या (अमेरिकन डॉलर 3 मिलियन) पॅकेजची नोकरी लागली. या तरुण अभियंत्याला जर्मनीतील टेस्ला गिगा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकाची जबाबदारी मिळाली आहे. ऑगस्टपासून बेंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याची नियुक्ती बर्लिनमध्ये होणार आहे. (Yashwant Chaudhary Job Offer)

चंपावत तल्लीहाट येथिल व्यापारी शेखर चौधरी यांचा मुलगा यशवंत चौधरी याने 2020 मध्ये पिथौरागढ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक केल्यानंतर GATEमध्ये 870 रँक मिळवले. दोन वर्षांपूर्वी यशवंत चौधरी बंगळुरू येथे प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्याने कोरोनाच्या काळात ऑनलाइन सेवा दिली.

Yashwant Chaudhary
भारत 2023 मध्ये राबणार पहिली मानवी अंतराळ अन् महासागर मोहीम

यशवंत चौधरीने सांगितले की, ऑनलाइन परीक्षेनंतर त्याची बर्लिन जर्मनीतील टेस्ला गीगा फॅक्टरीत 3 मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पॅकेजमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. 31 जुलैपर्यंत ऑनलाइन काम केल्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बंगळुरू येथे प्रशिक्षण होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये बर्लिनमध्ये सेवा सुरू होईल.

मल्लिकार्जुन शाळेने केला यशवंतचा गौरव

मल्लिकार्जुन शाळेने तल्लीहाटच्या यशवंत चौधरीच्या उत्तुंग यशाबद्दल आपल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव केला. शनिवारी शाळेत झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक संजय मुरारी यांनी यशवंतचा गौरव केला. यावेळी यशवंतचे वडील शेखर चौधरी, सूरज जोशी, दीपक पंगारिया, सुनील भट्ट, नीरज कलखुरिया, गौरव कलखुरिया, जागृती बिश्त, चंद्रशेखर बिश्त, गौरव पंत, विपीन पुणे आदी उपस्थित होते.

Yashwant Chaudhary
Sundar Pichai Birthday: सुंदर पिचाई यांचा IIT ते Google CEO पर्यंतचा प्रवास

सुरुवातीपासूनच बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणं हे त्याचं स्वप्न होतं, जेणेकरून त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळू शकेल आणि नंतर हा अनुभव आपल्या देशासाठी कामी पडेल, असे मत यशवंतने या कार्यक्रमात व्यक्त केले. उत्तराखंडमधील (Uttarakhand) राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांकडूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com