Yass Cyclone: ओडिशातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 मे 2021

 तोक्तेच्या कहरानंतर आता यास चक्रीवादळाच्या संकटाचे संकेत येऊ लागला आहे. राज्यांनी यावर खबरदारी घेणे सुरू केले आहे. तोक्ते वादळाचे गुजरात आणि महाराष्ट्रात तिव्र परिणाम बघायला मिळाले. भारतीय हवामान खात्याने 26 मे रोजी यास चक्रीवादळ ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता वर्तविलि आहे.

 तोक्तेच्या कहरानंतर आता यास चक्रीवादळाच्या(Yass Cyclone) संकटाचे संकेत येऊ लागला आहे. राज्यांनी यावर खबरदारी घेणे सुरू केले आहे. तोक्ते वादळाचे गुजरात आणि महाराष्ट्रात तिव्र परिणाम बघायला मिळाले. भारतीय हवामान खात्याने 26 मे रोजी यास चक्रीवादळ ओडिशा(Odisha)-पश्चिम बंगालच्या(West Bengal) किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता वर्तविलि आहे. ओडिशा सरकारने 30 पैकी 14  जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.(Yass Cyclone alerted several districts in Odisha)

या कारणासाठी गुरमीत राम रहीम तुरूंगातून बाहेर...

हवामान विभागाने गुरुवारी सांगितले की, 22 मे रोजी बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार होईल जो चक्रीवादळाच्या रूपात बदलू शकेते आणि 26 मे रोजी ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकू शकते. ओडिशाचे  मुख्य सचिव एस.सी. मोहापात्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, 'यास' चक्रीवादळाचा राज्यात काही परिणाम झाला तर राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाची संभाव्यता, मार्ग, वेग, किनारपट्टीवर आदळण्याचे ठिकाण इत्यादींची माहिती अद्याप दिली नसली तरी सरकारने तयारी सुरू केली आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा सुनिश्चित करण्यास केंद्र सरकारने सांगितले
केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांच्या आरोग्य केंद्रांवर अत्यावश्यक औषधे आणि संसाधने साठवल्या पाहिजेत, जेणेकरून यास वादळाच्या वेळी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जातांना वेळेत धावपळ होणार नाही. या महिन्याच्या शेवटी यास चक्रीवादळ  देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता आहे. गुरुवारी भारतीय हवामान खात्याने सांगितले की, 22 मे रोजी उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

ब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस अधिक जीवघेणा? वाचा सविस्तर           
येत्या 72 तासांत हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होण्याची सर्व शक्यता असल्याची माहिती विभागाच्या चक्रीवादळ कक्षाने दिली. हे वादळ उत्तर पश्चिम दिशेने वाटचाल करू शकते आणि 26 मे रोजी संध्याकाळी पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनारी पोहोचू शकते. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील वादळाच्या परिणामासह, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पूर्व कोस्ट जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शक्यता आहे.

संबंधित बातम्या