यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार नंदा खरे यांच्या कादंबरीला जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

नागपूरचे साहित्यकार नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठीचा 2020 चा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली:  2020 चा साहित्य आकादमीचा पुरस्कार आज जाहीर झाला असून नागपूरचे साहित्यकार नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला मराठीसाठीचा 2020 चा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय गोविंदा महाजन यांच्या लघुकथा संग्रहालाही बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा 'आबाची गोष्ट' असं लघुकथा संग्रहाचे नाव आहे.

आज 20 भाषामध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा साहित्य़ अकादमीने केली आहे. यामध्ये सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटके, एक- एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश आहे. तर मराठीसाठी सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

पुरस्कारांची शिफारस 20 भारतीय भाषांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात आली होती. यावर साहित्य आकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.

 

संबंधित बातम्या