येडीयुरप्पा दिल्लीत दाखल; 'उत्तराखंड पॅटर्न' ची पुनरावृत्ती होणार का ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांना मुख्यमंत्री पदावर हटवण्यात यावे अशी मागणी पक्षांतर्गतच जोर धरु लागली आहे.
येडीयुरप्पा दिल्लीत दाखल; 'उत्तराखंड पॅटर्न' ची पुनरावृत्ती होणार का ?
Chief Minister B. S. Yeddyurappa Dainik Gomantak

देशात कोरोनाचं सावट असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (Karnataka) कोरोनाच्या संकटाबरोबर राजकिय संकटाची चाहुल भाजपला लागू लागली आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटक (Karnataka) भाजमधील अंतर्गत मतभेद कोणत्या ना कोणत्या कारणांनी चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांना मुख्यमंत्री पदावर हटवण्यात यावे अशी मागणी पक्षांतर्गतच जोर धरु लागली आहे. या पाश्वभूमीवर येडीयुरप्पा यांना दिल्लीला बोलवण्यात आल्याने पुन्हा एकदा राजकिय चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे उत्तराखंडप्रमाणे (Uttarakhand) कर्नाटकही मुख्यमंत्री बदल होणार का ? अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे चार महिन्यातच तीन मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी झाली.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिल्लीमधील पक्षनेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले. ते त्वरित दिल्लीत दाखल झाले असून, प्रथमच येडीयुरप्पा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच दिल्ली नेतृत्वाने बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांना राज्यात परत जावून थेट राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तसेच उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंह धामी यांना राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंड मुख्यमंत्री पॅटर्न होणार का ? याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chief Minister B. S. Yeddyurappa
लोकांना उपचारासाठी पळावे लागणार नाही याची काळजी घ्या - पंतप्रधान

मंत्रीमंडळातील काही मंत्री आणि मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत. येडीयुरप्पा यांच्या कुटुंबीयांचा राज्य सरकारमध्ये सातत्याने हस्तक्षेप सुरु आहे. येडीयुरप्पा यांचा मुलगा सरकारच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप काही मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटक भाजपमधील मंत्री, नेते थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. याचबरोबर पक्षातील काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये येडीयुरप्पा यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन त्वरित हटवण्यात यावे अशी चर्चा सुरु आहे. या पाश्वभूमीवर पक्षाचे राज्यातील प्रभारी अरुणसिंह (Arun Singh) यांनी नुकतीच राज्यातील बड्या नेत्यांशी चर्चा केली होती.

Related Stories

No stories found.