येडियुरप्पा सरकारमध्ये सात नव्या मंत्र्यांचा समावेश 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

भाजपशासित कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी मत्रिमंडळाचा विस्तार केला आहे.बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 बंगळूरु: भाजपशासित कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी मत्रिमंडळाचा विस्तार केला आहे.बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री असणारे एच.नागेश यांना मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं आहे.सात नव्या मंत्र्यामध्ये ,एस अगांरा, मुरगेश निरानी,अरविंद लिंबवाली,उमेश कुट्टी हे विधानसभेचे आमदार आहेत.

तसेच विधानपरिषदेतील असणारे आमदार,एमटीबी नागराज,आर.शंकर,आणि सी.पी.नागेश्वर अशी नव्या मंत्र्यांची नावे आहेत.कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सात नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा त्यांच्याबरोबर त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि भाजपचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी अरुण सिंह राजभवनात उपस्थित होते.

कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांचे सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा सरकार स्थापन झालं.या सकारचा आत्तापर्यंतचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार आहे.सात नव्या मंत्र्यांपैकी आर शंकर आणि एमटीबी नागराज या बंडखोरांना आमदारांना मत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला.मात्र दुसरीकडे या मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजी ही दिसून आली आहे.

' निवडून न आलेल्या आमदारांना मत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे,याबद्दल भाजप आमदारांनी आक्षेप घेतला आहे.मंत्रिमंळातील बहुतेक मंत्री बंगळूरु आणि बेळगाव जिल्ह्यातील आसल्याकारणाने मंत्रिमंडळात सगळ्या भागांना प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना 'जेष्ठतेचा' विचार झाला नसल्याची तक्रार करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या