Yellow Fungus: काळ्या आणि पांढऱ्या बुरशी नंतर आता आली "पिवळी बुरशी"

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

गाझियाबाद (Ghaziabad) येथील एका ईएनटी (ENT) तज्ञाला पिवळ्या बुरशीचा (Yello Fungus) देखील प्रकार आढळले असल्याचे समोर आले आहे.

पांढऱ्या (White Fungus) आणि काळ्या बुरशीनंतर (Black Fungus) आता अलीकडेच, गाझियाबाद (Ghaziabad) येथील एका ईएनटी (ENT) तज्ञाला पिवळ्या बुरशीचा (Yello Fungus) देखील प्रकार आढळले असल्याचे समोर आले आहे. काळी आणि पांढरी बुरशी ही धोकादायक असली तरी, पिवळी बुरशी ही त्यापेक्षा धोकादायक असल्याचे तज्ञांकडुन सांगण्यात येत आहे. (Yellow Fungus: After the black and white fungus came now the yellow fungus)

गाझियाबादचे ईएनटी तज्ज्ञ डॉ बी.पी. त्यागी यांनी असे म्हटले आहे की, व्हाइट फंगसमुळे फूफसांना त्रास होतो, काळी बुरशी मेंदूवर हल्ला करते तर, पिवळ्या बुरशीचा परिणाम दोन्ही अवयवांवर होतो.

नाक आणि डोळ्यांतून रक्त येत असल्याने एका रुग्णाला त्याच्या मुलाने दवाखान्यात भरती केले, तेव्हा त्या व्यक्तीला पिवळ्या बुरशीने ग्रासले असल्याचे समोर आले आहे. तब्बल 2 महिन्यांच्या उपचारानंतर कोविड (Covid-19) मुक्त होऊन ही व्यक्ती घरी परतली होती. सध्या, डॉक्टर एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनद्वारे पिवळ्या बुरशीवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दोन जिल्ह्यांत 600 पेक्षा जास्त मुलं पॉझिटिव्ह; तिसरी लाट असल्याची भीती...

आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पिवळ्या बुरशीची लागण झाल्यास सुस्तपणा, भूक कमी लागणे, भूक न लागणे आणि वजन कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. तर गंभीर लक्षणांमध्ये जखम होणे, त्यातून पाणी येण्यासारखे प्रकार देखील होऊ शकतात.

अस्वच्छतेमुळे पिवळ्या बुरशीचे प्रमाण वाढू शकते, म्हणूनच आपण घर आणि आपले शरीर स्वच्छ राखणे महत्वाचे आहे. दरम्यान काही प्राणी वगळता आजपर्यंत कोणत्याही माणसात ही बुरशी आढळून आली नव्हती असे त्यागी यांनी सांगितले आहे. 

संबंधित बातम्या