एवढा मोठा कोब्रा कुठं असतो व्हय ! पकडताना वनविभागाला सुटला घाम

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

16 फूट लांबीचा कोबरा पाहून या कर्मचाऱ्यांना सुद्धा घाम फुटला होता.

आसाममधील नागाव येथे एका चहाच्या मळ्यात एक 16 फूट लांब किंग कोब्रा सापडला असल्याची माहिती मिळते आहे. सुमारे 20 किलो वजनाच्या या किंग कोब्राला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांनी शनिवारी हा किंग कोबरा पाहिला. भलामोठा विषारी साप पाहून चहाच्या मळ्यातील मजुरांनी वनविभागाच्या पथकाला माहिती दिली होती. (yesterday A King Cobra was rescued at a tea estate in Nagaon )

वनविभागाला मिळालेल्या माहितीनंतर घटनास्थळी पोहोचुन वनविभागाची टीम कोब्रा पकडण्यासाठी चहाच्या मळ्यात दाखल झाली आणि कोब्रा पकडण्यासाठी प्रयत्न करू लागली. त्यावेळी 16 फूट लांबीचा कोबरा पाहून या कर्मचाऱ्यांना सुद्धा घाम फुटला होता.  कारण साप विषारी आणि जास्त लांबीचा होता आणि त्याचे वजनही खूप जास्त होते. कोब्राने यावेळी वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तज्ञांची टीम आधीच सावध झालेली होती त्यामुळे ते  साप पकडण्यात यशस्वी झाले. 

चहाच्या मळ्यातुन या लांबलचक किंग कोब्राला (King Cobra) पकडल्यानंतर (Rescu) वनविभागाच्या पथकाने या सापाला जंगलात सोडले. दरम्यान या विषारी (Toxic) किंग कोब्रा  साप पाहण्यासाठी ग्रामस्थांचीही मोठी गर्दी जमली होती.एकूणच सापांच्या प्रजातींमध्ये कोब्रा हा अत्यंत विषारी साप आहे. असे म्हटले जाते की, एकदा कोब्राने पुरेसे अन्न खाल्ले तर तो पुढील दोन ते अडीच आठवड्यांपर्यंत अन्नाशिवाय राहू शकतो. 

पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी? वाचा पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान काय...

 

संबंधित बातम्या