योगी मंत्रिमंडळाला पंतप्रधान मोदींनी दिली "पूर्ण सहमती"

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर योगी आदित्यनाथ उद्या सलग दुसऱ्यांदा 45 मंत्र्यांसह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Yogi Adityanath & Prime Minister Modi, Yogi Adityanath's cabinet News
Yogi Adityanath & Prime Minister Modi, Yogi Adityanath's cabinet NewsDainik Gomantak

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर योगी आदित्यनाथ उद्या सलग दुसऱ्यांदा 45 मंत्र्यांसह उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी या संबंधीची माहिती दिली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेऊन शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळाची नावे निश्चित केली. (Yogi Adityanath and Prime Minister Modi have completely agreed on the names of the cabinet in UP)

त्याचवेळी, मंत्रिमंडळाच्या नावांवरील मतभेदांमुळे शपथविधी रखडल्याची अटकळ पक्षाने फेटाळून लावली आहे. योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मंत्रिमंडळाच्या नावांवर "पूर्णपणे सहमत" आहेत. भाजपने (BJP) अद्याप उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. केशव मौर्य आणि दिनेश शर्मा सध्याच्या पदावर कायम राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तर प्रदेशातील पक्षाचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा असलेले मौर्य यावेळी निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर शर्मा यांनी निवडणूक लढवलेली नाही. (Yogi Adityanath's cabinet News)

Yogi Adityanath & Prime Minister Modi, Yogi Adityanath's cabinet News
जेपी नड्डासह भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, यूपी मंत्रिमंडळावर 'मंथन'

दरम्यान, 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने 403 सदस्यीय विधानसभा जागांपैकी 274 जागा जिंकल्या आहेत. सलग दुस-यांदा सरकार सत्तेवर येण्याची ही तीन दशकांत पहिलीच वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com