तृणमूलचे रोमिओ 2 मे नंतर तुरुंगात जातील; यूपीच्या धर्तीवर अँटी रोमिओ स्कॉड

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कृष्णरामपूर येथे गुरुवारी मोर्चाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या धर्तीवर बंगालमध्ये अँटी रोमियो पथक बनविण्याविषयी बोलले.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षातील नेत्यांकडून बरीच आश्वासने दिली जात आहेत. असेच एक आश्वासन भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगाल निवडणुकीत दिले आहे. बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कृष्णरामपूर येथे गुरुवारी मोर्चाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या धर्तीवर बंगालमध्ये अँटी रोमियो पथक बनविण्याविषयी बोलले. (Yogi Adityanath criticized the Trinamool Congress)

निवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लंघन; न्यायालयाने सरकारला विचारला जाब

बहिणी आणि मुलींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भाजपा उत्तर प्रदेशप्रमाणे बंगालमध्ये अँटी-रोमियो (Anti Romeo)पथके तयार करेल आणि टीएमसीच्या सर्व रोमियोला तुरूंगात जातील, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या (West bengal) मतदाराना दिले आहे. कृष्णरामपूर मध्ये झालेल्या या सभेपूर्वी पूर्वी जलपाईगुडी येथे झालेल्या प्रचारसभेला  संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर तृणमूलच्या सर्व गुंडाना तुरुंगात पाठवले जाईल असे सांगितले. 

दरम्यान, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुडुचेरी मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) रणधुमाळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसहा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी दंड थोपटून उतरलेले पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या 294 जागांसाठी सुरु असलेल्या या निवडणुकीच्या 8 टप्प्यांपैकी 3 टप्पे पार पडले आहेत.   

संबंधित बातम्या