एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न; कुटूंबाने सुद्धा दिली परनागी

एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न; कुटूंबाने सुद्धा दिली परनागी
marriage

तेलंगणाच्या अदिलाबाद (Adilabad) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशातील बऱ्याच भागातील लोक लग्न करण्यासाठी मुलीच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे एका तरूणाने एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न केले आहे. एवढेच नव्हे तर लग्न तिघांच्या कुटुंबियांच्या संमतीने झाले आहे. असे सांगितले जात आहे की अर्जुन नावाचा हा तरुण तीन वर्षांपासून दोन्ही महिलांवर प्रेम करीत होता आणि त्याला दोघींशीही लग्न करायचे होते. (Young man married with two girls in adilabad)

अदिलाबाद जिल्ह्यातील उन्तुर मध्ये पार पडलेला हा लग्न समारंभ सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रजा परिषदेच्या जयवंतराव यांनी माध्यमांना दिलेल्या माहीतीनुसार "दोन्ही मुलींना त्याच मुलाशी लग्न करायचे होते आणि त्या दोघींनाही काहीही हरकत नव्हती, आणि आदिवासी समाजाची परंपरा अशा लग्नांना परवानगी देते."

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com