West Bengal Election: पहिल्यांदाच मतदानासाठी गेलेल्या तरुणाची गोळी घालून हत्या

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. आज पर्यंत झालेल्या वेगवगेळ्या निवडणुकांचा इतिहास पाहता पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आणि हिंसा हे समीकरण ठरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. आज पर्यंत झालेल्या वेगवगेळ्या निवडणुकांचा इतिहास पाहता पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आणि हिंसा हे समीकरण ठरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आज मतदान सुरु असताना कूच बिहार जिल्ह्यातील मतदान केंद्राबाहेर एका युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दोन गटांत मोठी चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी ही दिली आहे. तसेच या चकमकीत चार लोक ठार झाल्याची माहिती मिळते आहे.  (Young man shot dead during polling in West Bengal)

West Bengal Elections: मतदानाच्या दिवशी समोर आली 'वादग्रस्त ऑडिओक्लिप'

पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आलेल्या युवकाच्या हत्येनंतर तृणमूल कॉंग्रेसने असा आरोप केला आहे की, या हत्येमागे भाजपचा हात आहे. तर मृत युवक पोलिंग बूथवर पोलिंग एजंट होता आणि या हत्येसाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा दावा  'भगवा पक्षा'ने दावा केला आहे. आनंद बर्मन नावाच्या युवकाला सितलकुचीच्या पठाणतुली भागात असलेल्या  बुथ क्रमांक 85 वर मतदान सुरु असताना बाहेर खेचत आणले गेले आणि त्या युवकाला गोळी घालून ठार करण्यात आले. तसेच, या घटनेनंतर तृणमूल आणि भाजप समर्थकांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत मतदान केंद्राबाहेर बॉम्ब फेकल्यामुळे बरेच लोक जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय दलांना लाठीमार करावा लागला असल्याचे समजते आहे. तसेच आम्हाला कूचबिहार जिल्ह्यातील  सितलकुची येथील मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, आम्ही पर्यवेक्षकास लवकरात लवकर अहवाल द्यावा आणि परिस्थितीबद्दल माहिती देण्याचे आदेश दिले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलवे आहे. 

संबंधित बातम्या