तो युवक कोणाच्या संपर्कात

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

गोव्यातील एका कंपनीत काम करणारा हा युवक आपल्या मुळ गावी आला होता. तो परत कामावर गेला असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते.

कारवार

गोव्यात गेल्यावर कोरोनाची लागण झालेला अणशी येथील तो युवक कोणाच्या संपर्कात आलेला होता याची माहिती घेणे कारवार जिल्हा प्रशासनाने सुरु केले आहे. गोव्यातील एका कंपनीत काम करणारा हा युवक आपल्या मुळ गावी आला होता. तो परत कामावर गेला असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. हरीशकुमार के यांनी दिलेल्या माहितीनुसार अणशीचा एक युवक गोव्यात जाताना चेक पोस्ट वर तपासणी करण्यात आल्या वेळी कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. तो युवक गोव्यातील एका औषध उत्पादन कंपनीत कामाला होता १४ तारखेला लॉक डाऊन  संपल्यावर तो घरी अणशीला आला होता कारवार मधे दुचाकीत पेट्रोल भरून घेतले होते. घरी तो आई वडील व इतरांना भेटला होता त्यामुळे त्याने आणी कितीजणांना संक्रमित केले असेल या शंकेने इथै भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.या युवकाची माहिती गोळा करण्यास उप विभागाधिकार्याना सांगितले आहे.

संबंधित बातम्या