रद्दीचे काम करणारा रातोरात बनला करोडपती

गिरण्यांमधून (Mills) त्यांनी 7 लाख रुपये गुंतवून एकूण 6 कोटी रुपयांचा नफा कमावला. यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता अनेक कारखाने (Factory) आपल्या नावावर केले.
रद्दीचे काम करणारा रातोरात बनला करोडपती
युसूफ शरीफ Dainik Gomantak

कर्नाटक: विधानसभेची आगामी निवडणूक (Election) अब्जाधीशांची लढाई होऊ शकते. त्याचे नेतृत्व काँग्रेसचे उमेदवार युसूफ शरीफ हे करीत आहेत, यांनी मंगळवारी राज्य निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आपली संपत्ती जाहीर केली आहे. 54 वर्षीय युसूफ शरीफ (Yusuf Sharif) हे उमराह डेव्हलपर्स चे मालक आहेत.

एके काळी ते भंगार विक्रेता म्हणून काम करत होते. त्यानंतर असे काही घडले की बघता बघता हा भंगार विकणारा व्यापारी अब्जाधीश झाला. शरीफ यांच्याकडे दोन रोल्स रॉयस कार आहेत. नुकतेच त्याचे नाव चर्चेत येत आहे. त्याची एक कार टॅक्स न भरल्याच्या संशयावरून जप्त केली आहे.

युसूफ शरीफ
कर्नाटक सरकारचा अजब फतवा; KSRTC बसमध्ये मोबाईलवर गाणी वाजवण्यास बंदी

त्यांच्याकडे असलेली रोल्स रॉयस कार त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडून खरेदी केली होती. गुजरी बाबू किंवा स्क्रॅप बाबू म्हणून त्यांना ओळखले जाते. शरीफ यांना यापूर्वी फसवणुकीच्या प्रकरणांना सामोरे ही जावे लागले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने 20 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये युसूफ शरीफ यांच्या नावाचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख केली जाहीर

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार विधान परिषदेच्या 25 जागांसाठी 10 डिसेंबर रोजी निवडणूका होतील. या निवडणुकीचा निकाल 14 डिसेंबरला जाहीर होईल.

तसेच, त्याच तारखेला तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेचच संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर आहे.

युसूफ शरीफ
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

शरीफ कसे झाले श्रीमंत?

युसूफ यांचा जन्म कोलार गोल्ड फिल्ड्सच्या गरीब कुटुंबात झाला. 14 भावंडांमध्ये ते सर्वात मोठे आहेत. पैशाअभावी त्यांना अभ्यास करता आला नाही आणि घर चालवण्यासाठी त्यांनी तरुण वयातच काम करायला सुरुवात केली. कर्ज घेऊन त्यांनी भंगाराचे दुकान सुरू केले. पण 2001 मध्ये त्यांच्या नशिबाने अचानक कलाटणी घेतली आणि ते बघता बघता करोडोंचे मालक बनले.

2001 मध्ये कोलार गोल्ड फिल्ड्सने 21 मिलच्या टाक्यांचा लिलाव केला, ज्याची कमाई युसूफने 7 लाख रुपयांना आपल्या नावावर केली. या टाक्या ब्रिटिशकालीन होत्या. यातील एका टाकीत त्याला 13 किलो शुद्ध सोने सापडले. ज्याची किंमत जवळपास 5.59 कोटी रुपये होती. म्हणजेच या गिरण्यांमधून (mills) त्यांनी 7 लाख रुपये गुंतवून एकूण 6 कोटी रुपयांचा नफा कमावला. यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता अनेक कारखाने आपल्या नावावर केले. आज ते 1,743 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com