ऑर्डर रद्द केल्य़ामुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयने चक्क महिलेचं नाक फोडलं

ऑर्डर रद्द केल्य़ामुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयने चक्क महिलेचं नाक फोडलं
Zomato delivery boy blows womans nose over order cancellation

बंगंळूरु: झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळूरुमधील एका महिलेने केला आहे. ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून त्याने घरात घुसून आपल्याला मारहाण केली असं महिलेने सांगितले आहे. कंटेट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतरचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हितेशाच्या नाकातून रक्त येत आहे. मारहाणीनंतर आपली ही अवस्था झाली असल्याचं हितेशा सांगितले. दरम्यान झोमॅटोने या घटनेवर लगेच प्रतिक्रिया दिली असून आमचा स्थानिक प्रतिनिधी तुम्हाला पोलिस तपासामध्ये मदत करणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.

हितेशा व्हिडिओमध्ये आपले रक्तबंबाळ झालेले नाक दाखवत आहे. ‘’माझी झोमॅटो डिलिव्हरी उशिरा आली आणि मी त्यावेळी कस्टमर केअरशी बोलत होते, दरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं. त्याने मला रक्तबंबाळ केलं आणि त्याच अवस्थेत सोडून त्याने तिथून लगेच पळ काढला,’’ असं हितेशा सांगत आहे.

त्यानंतर लगेच हितेशाने अजून एक व्हिडिओ शेअर केला असून यावेळी तिने आपल्या नाकाला पट्टी लावली आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, सकाळपासून मी काम करत असल्यामुळे झोमॅटोवरुन जेवन मागवलं होतं. दुपारी साडे तीनच्या आसपास मी ऑर्डर दिली होती. जी साडे चार वाजण्याच्या सुमारास ऑर्डर आली होती. ऑर्डर वेळेत न आल्यामुळे वारंवार फोन करत होती. एक तर मला मोफत द्या नाहीतर ऑर्डर रद्द करा असं सांगत होती.’’

त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉय आला होता. त्यावेळी मी दरवाजा न खोलता कस्टमर केअरशी बोलत असल्याचे त्याला सांगितले होते. ऑर्डर बऱ्याच कालावधीनंतर आल्यामुळे ती नको असं मी त्याला सांगितले होते. त्याच वेळी त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मी तुमच्या घरचा नोकर आहे का? असं त्याने मला विचारले. त्यावेळी खूप मी घाबरले होते, लगेच मी दरावाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने दरवाजा ढकलून  घरामध्ये आला, आणि माझ्याकडून त्याने ऑर्डर हातातून हिसकावून घेतली. रागामध्ये माझ्या नाकावर जोरात ठोसा लगावला आणि त्याने तिथून लगेच पळ काढला,’’ असं हितेशाने आपल्या व्हिडिओतून सांगितले. 


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com