डिलिव्हरी बॉयने बंगळुरुच्या महिलेचे आरोप फेटाळल्यावर झोमॅटोने दिली अधिकृत प्रतिक्रिया

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

झोमॅटोचे फाउंडर दिपेंद्र गोयल यांनी म्हटल आहे की, हितेशाचा मेडिकल खर्च आम्ही करत आहोत.

बंगळूरु: झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप बंगंळुरुमधील एका महिलेने केला होता. घरात घुसून आपल्याला मारहाण झाली असल्याचे तिने सांगितले. कंटेट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतरचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला असून तिच्या नाकातून रक्त येताना दिसत आहे. मारहाणीमुळेच आपली ही परिस्थिती झाली असल्याचे यावेळी हितेशाने सांगितले. दरम्यान या घटनेनंतर झोमॅटोने प्रतिक्रिया दिली असून आमचा स्थानिक प्रतिनिधी तुम्हाला पोलिस तपासामध्ये मदत करेल असं आश्वासन दिले होते.

मात्र ज्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने हितेशावर हल्ला केला होता त्याने आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने म्हटले की, ''या महिलेने माझ्याशी दुर्व्यवहार केला. मला ट्रफिकमुळे पहिल्यांदाच उशिरा झाला होता. त्यानंतर संबंधित महिलेने माझ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हितेशाने जेवन ठेवून घेतले मात्र पैसे देण्यास नकार दिला होता. ज्यावेळी मी तिला पैसे मागितले त्यावेळी मला गुलाम म्हणून ओरडली आणि तु काय करु शकतोस? असा प्रश्न विचारला. ऑर्डर रद्द झाल्यानंतर जेव्हा मी तिच्याकडे जेवण मागितले तेव्हा तिने देण्यास मनाई केली. तिच्या या दुर्व्यवहारनंतर मी त्य़ा ठिकाणाहून निघालो. तेव्हा तिने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि चप्पलही फेकून मारली. त्यावेळी मी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला.'' असं कामराजने सांगितले.

ऑर्डर रद्द केल्य़ामुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयने चक्क महिलेचं नाक फोडलं

या सगळ्या घटनाक्रमावर झोमॅटोकडून अघिकृत प्रतिक्रिया आली आहे, झोमॅटोचे फाउंडर दिपेंद्र गोयल यांनी म्हटल आहे की, ''हितेशाचा मेडिकल खर्च आम्ही करत आहोत. हितेशा आणि कामराजशी या दोघांशीही आमचा संपर्क आहे. नियमानुसार कामराजवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याच्यावर कायदेशीर बाबींसाठी येणारा खर्च आम्ही उचलत आहोत. कामराजने गेल्या 26 महिन्यामध्ये 5 हजाराहून अधिक डिलिव्हरी केल्या आहेत. त्याला 4.57  रेटिंग मिळाले आहे. या प्रकरणामधील जे काही सत्य आहे ते लवकरच सर्वांच्या समोर येईल.'' 

संबंधित बातम्या