Zydus Cadila च्या औषधाला भारतात परवानगी!
Zydus Cadilas drug allowed in India

Zydus Cadila च्या औषधाला भारतात परवानगी!

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ देश कोरोनाशी लढा देत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही देशात रोज शेकडोंनी कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. असं असताना देशासाठी कोरोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसला आहे. Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषण कोरोनावरील उपचारासाठी देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थातच (Drugs Controller Genral Of India) ने मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरता येणार आहे. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांचे निकाल हे सकारात्मक असून औषध दिल्यानंतर 7 व्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने करण्यात आला आहे.

झायडसनं जाहीर केलेल्या निकालानुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण 91.15 टक्के एवढं आहे. हे औषध दिलेल्या कोरोनाबाधितांपैकी 91.15 टक्के रुग्णांचे अहवाल हे 7 दिवसांमध्येच निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारावर देण्यात येत असलेल्या इंजेक्शनप्रमाणे त्वचेच्या खाली द्यावं लागत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, विराफीन दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण वेगाने बरा होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरा होत असल्यामुळे त्यांना ऑक्सिजनची गरज भासत नाही. तसेच, रुग्णाचा रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com