विधानसभा अधिवेशनात नागरिकत्‍व कायद्यावर चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर खुली चर्चा करण्यास मुख्यमंत्री तयार झाले आहेत. त्याामुळे येत्या विधानसभा अधिवेशनात या विषयावर खुल्या चर्चा घेण्यासाठी ठराव मांडण्या्त येणार आहे. यादरम्यान कॉंग्रेसमधून गेलेल्या आमदारांचे खरे रंग देखील समोर आणण्याची आणि पाहण्या‍ची संधी मिळणार आहे. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड हे दोन सजग पक्ष एकत्र मिळून गोव्यातील सध्याच्या समस्यांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

पणजी येथे घेण्यारत आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत आमदार जयेश साळगावकर, विनोद पालयेकर आदी उपस्थित होते.

भाजपात गेलेले ख्रिश्चिन आमदार शुक्रवारी मडगांव येथे झालेल्या चर्च संस्थेने पुकारलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले नाहीत. तेव्हा ते आपले मूळ आणि धर्म विसरले आहे की काय? देशात या कायद्यांना इतका मोठा विरोध होत असताना हे लोक शांत कसे बसू शकतात. मानवी हक्कांवर गदा आणण्या चे प्रकार या कायद्यांमधून सुरू झाले असून लोकांनी निवडून दिलेले हे प्रतिनिधी मात्र शांत का आहेत, असा प्रश्न  सरदेसाई यांनी केला.

खाण लिजांच्या नूतनीकरणाविषयी लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशावर बोलताना विजय सरदेसाई म्हणाले, लोकायुक्तांच्या शिफारशी नुसार भ्रष्टाचार विरोधी शाखेत एफआय्आर नोंद करणे गरजेचे आहे .कर्नाटकात न्यायमूर्ती हेग़डे यांनी दिलेल्या लोकायुक्त आदेशात कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र गोव्यात लोकायुक्तांच्या आदेशाविषयी काहीच केले जात नसून सत्ताधारी पक्षात सत्तावीस आमदार असल्याने काहीही करण्यास मोकळीक असल्याप्रमाणे सरकाराची वागणूक दिसत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

संबंधित बातम्या