पाच कोटींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजी: आयुक्त मिहिर रंजन यांच्या अध्यक्षतेखाली गोवा सीमाशुल्क विभागाने पाच कोटी रुपयांच्या् ड्रग्ज ची विल्हेलवाट लावली.

पणजी: आयुक्त मिहिर रंजन यांच्या अध्यक्षतेखाली गोवा सीमाशुल्क विभागाने पाच कोटी रुपयांच्या् ड्रग्ज ची विल्हेलवाट लावली.

नार्कोटिक ड्रग्स सायकोट्रॉपिक सबस्टम्स ३५४९ एक्स्टसी टॅब्लेट, ९६० ग्रॅम एमडीएमए पावडर, ४०.७ इट्स केटामाइन लिक्विड, ५३५३.६२ किलोग्राम केटामाइन पावडर, ९.३ किलो चरस आणि ४.९९५ किलो फेड्रिन यांची विल्हे्वाट लावण्या५त आली. याचे मूल्य  पाच कोटींच्याॅ आसपास असण्यासची शक्यनता आहे. गोवा कस्टम डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, गोवा यांनी सहआयुक्तल प्रज्ञाशील जुमले, सहआयुक्त डॉ. राघवेंद्र पी., सहाय्यक आयुक्त सुनील कुमार सहजलन यांच्या, देखरेखीखाली हे काम करण्यातत आले.

मध्यवर्ती अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने २४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून औषधे विल्हेवाट लावण्यासाठी असणाऱ्या नियमांचे पालन करून हे काम केले. सहकार्य केल्याबद्दल आयुक्तानी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा मेडिकल कॉलेजचे आभार मानले.

मादक पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी ही जागतिक समस्या आहे. गोव्यायतील विमानतळ व इतर ठिकाणी लक्ष ठेवून भारतीय कस्टम सीमा हे काम करीत आहे.
 

संबंधित बातम्या