राष्ट्रवादी, ‘आप’च्‍या उमेदवारांना मतदान करू नका

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

नावेली: जिल्हापंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पक्षाच्‍या (आप) उमेदवाराला मतदार करू नका. या पक्षांच्या उमेदवाराला मतदान करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासारखे होईल. त्‍यासाठी दक्षिण गोव्यातील मतदारांनी काँगेस पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन दक्षिण गोवा लोकसभा खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. यावेळी सुभाष फळदेसाई हे उपस्थित होते.

जिल्हापंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कुठल्याही पक्षाजवळ युती केलेली नाही. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोने) ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभे केलेले नाहीत. काँग्रेस पक्ष मगोच्या उमेदवाराना पाठिंबा देणार आहे, असेही त्‍यांनी सांगितले.
सांकवाळ जिल्हापंचायतीसाठी भाजपाचा उमेदवार अनपेक्षितपणे निवडून आला. कुठेतरी ‘मॅच फिक्‍सींग’ झाल्याचा दावा त्यांनी केला. गोव्यात जिल्हापंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचेच उमेदवार निवडून येणार. काँग्रेस पक्षालाच पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास खासदार सार्दिन यांनी व्यक्त केला. जे अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्यास तयार आहेत, त्यांना काँग्रेस सहकार्य करायला तयार आहे.

भाजपा सरकारला गोव्यात खनिज व्यवसाय सुरू करण्यास अपयश आले असून त्यांनी केवळ लोकांना आश्‍वासने दिली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांजवळ चर्चा करून म्हादईचा विषय सोडवावा, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने युती केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गोव्यात युती कदाचित होईलही, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या