पेडण्यात कसिनो नकोच, प्रयत्न हाणून पाडू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पेडणे : पेडणे तालुक्यातील गावांत कसिनो आणण्यासाठी काहीजणांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे येथील संकृती नष्ट होऊन भावी पिढीचे भवितव्य अंधारमय होणार आहे. कुणाच्या दवाबाला भीक न घालता पेडणे तालुक्यातील जनतेने संघटित राहून पेडण्यात कसिनो आणण्याचे प्रयत्न  हाणून पाडूया, असे आवाहन येथील व्हायकाउंट हायस्कूलच्या मैदानावर ‘गोंयचो आवाज’ संघटनेने रविवारी आयोजित केलेल्या, जाहीर सभेतून करण्यात आले.

पेडणे : पेडणे तालुक्यातील गावांत कसिनो आणण्यासाठी काहीजणांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे येथील संकृती नष्ट होऊन भावी पिढीचे भवितव्य अंधारमय होणार आहे. कुणाच्या दवाबाला भीक न घालता पेडणे तालुक्यातील जनतेने संघटित राहून पेडण्यात कसिनो आणण्याचे प्रयत्न  हाणून पाडूया, असे आवाहन येथील व्हायकाउंट हायस्कूलच्या मैदानावर ‘गोंयचो आवाज’ संघटनेने रविवारी आयोजित केलेल्या, जाहीर सभेतून करण्यात आले.

सभेला सुमारे साडेपाचशेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. प्रत्येकजण स्वखर्चाने आपापल्या वाहनांनी आले होते. यावेळी सभेच्या आयोजन खर्चासाठी मदतपेटी फिरविण्यात आली. त्याद्वारे २४,२३८ रुपयांची रक्कम जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले.

महसुलासाठी पर्याय शोधावा लागेल

आपा तेलींची गर्जना..
मगो पक्षाचे खजिनदार तथा निवृत्त पोलिस अधीक्षक आपा तेली यांनी सडेतोड भाषण केले. ते म्हपणाले, पणजी येथील कसिनोंची घाण आम्हाला पेडणे तालुक्यात नकोच. कसिनोंमुळे अमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय, असे अनेक वाईट प्रकार सोबत येतात. कसिनोमुळे मांडवी नदीचे अस्तित्व संपले आहे. आमची संस्कृती, आमचा समाज, नद्या, पर्यावरण नष्ट होणार. पेडण्याीचे सौंदर्य अबाधित ठेवण्यािसाठी कसिनो पेडण्याआत नकोच, असे सांगितले.

जमिन माफियांबरोबर संधान : फर्नांडिस
गोंयचो आवाजचे निमंत्रक कॅप्टन विरायतो फर्नांडिस म्हणाले की, पणजीतील कसिनोंची घाण पेडणे तालुक्यात आणण्याचे निश्चि्त झाले आहे. त्यासाठी धारगळ येथे ४ लाख २७ हजार चौ. मी. जमीन, तर पेडणे नगरपालिका क्षेत्रात १४ लाख ७० हजार चौ.मी. जमीन घेण्याणत आली आहे. या व्योतिरिक्त पेडणे तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारे जमिनी घेतल्या आहेत. त्यात परराज्यातील माफियांबरोबर राज्यातील एका मंत्र्याचा भाऊही कार्यरत असल्या चे सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

उपमुख्य्मंत्र्यांकडून दिशाभूल...
आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे लोकांची दिशाभूल करीत आहेत. ते सांगत आहेत की, गोंयचो आवाजवाले तुमची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या सभेला जाऊ नका, असे सांगून लोकांवर दवाब आणला जात आहे. या ठिकाणी फलकावर आम्ही गाव, सर्व्हे क्रमांक जमिनी विकत घेणारे यांच्या नाव, क्रमांकासहित सगळे दाखवतो. त्यांनी ते खोटे म्हणून सिद्ध करून दाखवावे, असे मी त्यांना जाहीर आव्हान देतो, असे आव्हान कॅप्टन विरायतो फर्नांडिस यांनी दिले. तसेच उपमुख्यनमंत्र्यांचा अमेरिका दौरा कुणी पुरस्कृत केला होता, हे उघड आहे. यापूर्वी कसिनो बंद करणार म्हणून सांगणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सत्तेवर आल्यानंतर कसिनोला प्रोत्साहन कसे दिले. त्यांच्याच काळात कसिनोंची संख्या वाढली, असेही फर्नांडिस म्‍हणाले.
गोवा

संबंधित बातम्या