नवेवाडे येथे कुत्र्याला विष घालून मारण्याचा प्रकार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

मुरगाव: नवेवाडे वास्को येथील श्री जयसंतोषी माता मंदिर परिसरात एका तीन महिन्याच्या पाळीव कुत्र्याला विष घालून मारण्याची घटना घडली.याप्रकरणी वास्को पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.सत्तरीत वाघांची हत्त्या करण्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी नवेवाडे घरासमोर बांधून ठेवलेल्या एका पाळीव कुत्र्याला जेवणात विष कालवून जीवंत मारण्यात आल्याचे कुत्र्याचे मालक वासुदेव साळगावकर यांनी सांगितले.

नवेवाडे येथील समाजसेवक वासुदेव साळगावकर यांच्या मालकीचा ‘टॉमी’ नामक कुत्रा घरासमोर बांधून ठेवला होता.तथापि, काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्याला अज्ञाताने भातात विष कालवून खायला दिले, त्यातच तो मृत्युमुखी पडला.याप्रकरणी श्री.साळगावकर यांनी वास्को पोलिसांकडे तक्रार केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत कुत्रा आणि त्याला खायला घातलेले जेवण ताब्यात घेतले.आज सोमवारी कुत्र्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.कुत्रा कोणत्या कारणामुळे मृत्युमुखी पडला याची चाचपणी करण्यासाठी कुत्र्याला खायला घातलेल्या अन्नाचे नमुने पोलिसांनी घेऊन हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
दरम्यान, एका मुक्या जनावराला विष घालून जिवंत मारल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करण्यात येत आहे.
 
संबंधित बातम्या