ड्रग्सचे खापर मुख्यमंत्री पोलिसांवर फोडू नका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

कळंगुट:अमलीपदार्थाचे खापर पोलिसांवर फोडू नका
मंत्री मायकल लोबो यांची पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना कोपरखळी
गोव्यातील अमलीपदार्थ व्यवहारासंबंधी अलीकडे अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.यातून बहुतांश आरोप हे स्वतःची जबाबदारी झटकून इतरांवर टाकण्यासाठी केले जातात.केवळ विधाने करून हा प्रश्न सुटणार नाही.तसेच पोलिसांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या माथ्यावर खापर फोडून काहीच साध्य होणार नाही अशा शब्दात कचरा व व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी आपले सहकारी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना कोपरखळी मारली.

उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री आजगावकर यांनी या भागात ड्रग्ज सापडतो तिथे संबंधित पोलिस निरीक्षक व पोलिसांचे निलंबन करावे असे विधान मंगळवारी केले होते.त्याला अनुसरून बुधवारी मंत्री लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांगून ड्रग्जच्या उच्चाटनासाठी विशेष टीम बनवावी लागेल. त्यात अधिकाऱ्यांचा समावेश असेल.याशिवाय जर २० दिवसांनी आढावा बैठक घेतली पाहिजे, असे लोबो म्हणाले. अमलीपदार्थ व्यवहाराबाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत असून ते थांबवण्याची गरज आहे. अमलीपदार्थांचे उच्चाटन हे बोलणे इतके सोपे काम नाही यासाठी प्रामाणिकपणा हवा. ड्रग्जच्या नायनाटासाठी प्रत्येकाचे योगदान हवे. शिवाय पोलिस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, अमलीपदार्थविरोधी पथक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.राजकीय नेते, मंत्री, आमदार या नात्याने प्रत्येकाची जबाबदारी आहे. गोव्यात ग्जचा व्यवहार चालतो. मात्र, आम्ही केवळ आरोप करतो. एक वेळ मी देखील असेच आरोप केले होते.मात्र, आरोप करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले.

गोळावली वाघ मृत्‍यूप्रकरणी पाचही जणांना नवव्या दिवशी जामीन

मुख्यमंत्री निधीअंतर्गत धनादेश प्रदान
कांदोळी येथील रेमंड डायस या पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या घराला आग लागल्याने त्यांच्या घराची मोठी हानी झाली होती. डायस यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत ५० हजार तसेच पंचायतीतर्फे सरपंच, पंचायत सदस्य यांनी आपल्या पगारातून २५ हजार व आणखीन वीस हजार रुपये मिळून एकूण ९५ हजार रुपयांचा धनादेश मंत्री मायकल लोंबो यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम कळंगुट येथे मायकल लोबो यांच्या कार्यालयात पार पडला.

संबंधित बातम्या