व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करू नये

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी

आमच्या स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करण्याऐवजी हे सरकार त्यांच्या हिताच्या विरोधात एकतर्फी निर्णय घेण्यास व अधिकाधिक बेरोजगारी निर्माण करण्यास इच्छुक आहे. जवळपास ३२ वर्षानंतर सरकार अचानकपणे या व्यावसायिक अभ्यासक्रमांना का थांबवू इच्छित आहेत, त्यामागील उद्देश व स्पष्टीकरण करावे.

पणजी : पुढील शैक्षणिक वर्षापासून गोव्यातील उच्च माध्यमिक शाळांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या संदर्भात कोणताही एकतर्फी निर्णय गोमंतकातील युवकांमध्ये असलेल्या कौशल्याला बाधक ठरेल, असे मत गोवा काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.

अडीचशेपेक्षा जास्त अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भवितव्याचा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. तसेच दरवर्षी ४०००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जे स्वत: इयत्ता अकरावीच्या विविध व्यावसायिक शाखेत प्रवेश देतात, त्यांनाही याचे त्रास सहन करावे लागणार. त्यामुळे सरकारचा निर्णय चुकीचा ठरेल, असे चोडणकर म्हणाले.

जेव्हा सरकार शैक्षणिक व्यवस्थेत बदल करण्याचा विचार करते, तेव्हा शिक्षण तज्ज्ञांचे मत विचारात घेतले पाहिजे. तथापि, आम्ही पाहतो की, सध्याची व्यवस्था छुप्या पद्धतीने योजना आखत आहेत आणि आपल्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हा चांगला मार्ग नाही. हे व्यावसायिक अभ्यासक्रम थांबविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने संवाद साधून त्यांच्यातील चांगल्या - वाईट बाबींविषयी चर्चा करून भविष्यहितासाठी योग्य रस्ता तयार करावा. या अडीचशे कर्मचारी आणि व्यावसायिक शिक्षणाद्वारे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ४००० हून अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सरकारने कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे का? असा प्रश्‍न त्यानी उपस्थित केला आहे.

मोरजीत साडेनऊ लाखांचा ड्रग्ज जप्त

१९८८ च्या साली गोव्यात व्यावसायिक अभ्यासक्रम काँग्रेस सरकारने सुरू केला. या अभ्यासामधून गोव्यातील अनेक विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित केले, ज्यांपैकी बऱ्याचजणांना मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगारही मिळाला आहे, तर काहींनी स्वतःहून व्यवसाय सुरू केला. त्यामुळे हा व्यावसायिक अभ्यास बंद केल्यास तांत्रिक कौशल्य ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर गोव्यात अनेक उच्च माध्यमिकमध्ये असलेले व्यावसायिक शिक्षक बेरोजगार होण्याची शक्यता आहे, असे चोडणकर यांनी मत व्यक्त केले आहे.

 

संबंधित बातम्या