बायंगिणी येथे कचरा प्रकल्प नकोच!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पणजी : बायंगिणी येथे प्रस्तावित असलेल्या कचरा प्रकल्पाला आज जुने गोवे ग्रामस्थांनी जमून विरोध दर्शविला. जुने गोवे येथील गांधी पुतळ्याजवळ जमून लोकांनी बायंगिणी येथे कचरा प्रकल्प नको अशी मागणी करत निदर्शने केली. दरम्यान, कचरा प्रकल्पाला विरोध म्हणून येथील व्यवसायिकांनी आज दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला.

बायंगिणी येथे खासगी जागेत काही दिवसांपूर्वी खड्डे खोदून कचरा पुरण्यात आला होता. तेव्हा कचरा नेणारे ट्रक ग्रामस्थांनी अडवून त्याच ठिकाणी थांबविले होते. त्याशिवाय सामजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही कचरा पुरलेल्या जागेची पाहणी केली होती. परंतु बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला जुने गोवे ग्रामस्थांचा विरोध कायम राहिला आहे. 
त्याशिवाय कदंब पठारावर राहणाऱ्या लोकांनीही या प्रकल्पास विरोध केला आहे. सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रकल्पास दाखला मिळण्याचा अवधी असून कचरा व्यवस्थापन महामंडळ त्या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे.

आम्ही  भोगले, आणखी कुणाच्या  वाट्याला नको

दरम्यान, याप्रसंगी प्रजल साखरदांडे, रामा काणकोणकर, फादर सावियो, सामील वळवईकर, ॲना ग्रासिएस, मारियानो फेर्रांव, निकांत भोमकर (पंच जुने गोवे), सेबी रॉड्रिग्ज यांनी आपल्या भाषणात कचरा प्रकल्पाच्या धोक्याचे स्वरूप स्पष्ट करीत विरोध दर्शविला. याप्रसंगी करमळी, खोर्ली, जुने गोवेचे सरपंच, सांत इस्तेवचे उपसरपंच, पंच सदस्यांसह जुने गोव्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
संबंधित बातम्या