कासावलीतील रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

वास्को:आमदार एलिना साल्ढाणा यांनी घेतली सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांची भेट
स्थानिक नागरिकांना दुपदरी रेल्वेमार्ग नको असल्यास आम्ही काहीच करू शकत नाही. पोर्तुगीज, ब्रिटिश यांनी गोळीच्या जोरावर केले तसे आम्ही करू शकत नाही.राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने आम्ही दुपदरीकरणाचे काम हाती घेत आहोत, जर उद्या राज्य सरकारला दुपदरी रेल्वे मार्ग नको असेल तर आम्ही सदर प्रकल्प दुसरीकडे नेऊ, असे दक्षिण पश्र्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी रविवारी स्पष्ट केले.

दुपदरीकरणामुळे कासावली भागातील शेकडो जुनी घरे पाडावी लागणार असल्याने कासावली भागातून नेण्यात येणाऱ्या दुपदरीकरणाला आमचा विरोध आहे. तेथील लोक आपल्या जुन्या घरासंबंधी संवेदनशील असल्याने सदर दुपदरीकरणासाठी दुसरा पर्याय पाहावा, असे कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.
अजयकुमार सिंग हे वास्को रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी रविवारी सायंकाळी आले होते.याप्रसंगी त्यांच्यासमवेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे होते.यावेळी साल्ढाणा व कासावलीच्या सरपंच मार्था साल्ढाणा यांनी अजयकुमार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कासावलीतून नेण्यात येणाऱ्या दुपदरीकरणासंबंधी चर्चा केली.याप्रसंगी राज्य किंवा केंद्र सरकारने सदर दुपदरीकरण प्रकल्प थांबविण्यास सांगितला तर आम्ही तो जबरदस्तीने पुढे नेऊ शकत नसल्याचे सिंग यांनी सांगितले. कोणताही प्रकल्प हाती घेताना शेकडो, हजारो वर्षापूर्वीची बांधकामे पाडावी लागतात. झाडे कापावी लागतात. ते करण्यावाचून पर्याय नसतो.बंगलुरू येथे रेल्वेमार्ग विस्तारीकरण करताना हजारो बांधकामे हटवावी लागली असे त्यांनी सांगितले.रस्त्यासाठी तुम्ही जागा देता मग रेल्वेला विरोध का? असे प्रश्‍‍न त्यांनी विचारला.
कासावली येथील बांधकामे पाचशे वर्षापूर्वीची वारसा स्थळे आहे.त्या घरांभोवती लोकांच्या भावना गुंतल्या आहेत. आमचा विकासाला विरोध नाही. तथापी येथे दुपदरीकरण रेल्वे मार्ग लोकांच्या दारातून जात आहे.गोवा हे अतिशय लहान राज्य आहे. महाराष्ट, कर्नाटकसारखे मोठे राज्य नाही. त्यामुळे दुपदरीकरण करताना कासावलीच्या घरांचा विचार करण्याची गरज आहे, असे साल्ढाणा यांनी सांगितले.

कोमुनिदाद इमारतीवरील हक्क सोडा

संबंधित बातम्या