टाळेबंदीतही डॉ. काणेकर यांची रुग्णसेवा

suraj-kanekar
suraj-kanekar

कुठ्ठाळी,

गोव्यासह इतर राज्यामध्ये योग व प्राणायमचा प्रसार तथा प्रचार करणारे कुठ्ठाळीतील नामवंत डॉ. सूरज काणेकर हे सध्या कुठ्ठाळीमध्ये रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणांहून तपासणीसाठी रुग्ण मोठ्या आशेने त्यांच्याकडे येत आहेत. टाळेबंदीच्या काळात रुग्णांना खरी वैद्यकीय तपासणीची गरज असल्याने त्यांनी आपले क्लिनिक सुरू ठेवले आहे.
याबाबत डॉ. काणेकर म्हणाले, की याप्रसंगी आपली आपल्या रुग्णांना खरी गरज आहे. अशावेळी आपण कर्तव्यापासून पाठ फिरवू शकत नाही. एखाद्यावेळी रुग्णाचे निधन झाल्यास प्रमाणपत्र दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अशा परिस्थितीच्यावेळी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रामुख्याने तीन गोष्टींकडे लक्ष द्यावे. सदैव व्यायाम व प्राणायाम, योग अर्धा तास करावा. दिनचर्या योग्यरीत्या पाळावी. संतुलीत आहार घ्यावा, घरघुती जेवण तयार केल्यानंतर लगेच जेवायचे. ते संध्याकाळी परत वापरायचे नाही. घरघुती हळदी, मिरी, तुळशी वापरून तयार केलेला काढा प्यावा. रात्री आठ वाजता जेवण केल्यानंतर एका तासानंतर झोपावे, झोपण्यापूर्वी हळद घालून देशी गायीचे दूध प्यावे, त्यानंतर ध्यान साधना करावी, जेणेकरून शरीराची रोग प्रतिकार शक्त वाढल्याने कोणत्याही नकारात्मक विचार शरीरात प्रवेश करीत नाही. सुखद अशी झोप लागते. या गोष्टींचा सर्वांनी सदैव उपयोग करावा, असे डॉ. काणेकर म्हणाले. कुणालाही आपल्या शंका दूर करायच्या असतील तर त्यांनी मोफत सल्यासाठी डॉ. काणेकर यांना ९४२३०६६६५३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com