ड्रॅग संस्थेतर्फे दिव्यांगासाठी उपक्रम

Dainik Gomantak
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

पणजी,

पणजी,

 नवीन वर्षात अनेकजण अनेक संकल्‍पना आखत असतात आणि त्‍या पूर्ण करण्‍याच्‍या हेतूने कामही करीत असतात. दिव्‍यांग हक्‍क संघटना म्‍हणजेच ड्रॅग यांनीही यावर्षी आगळावेगळा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. आपल्‍या आजूबाजूचा भवताल दिव्‍यांगासाठी प्रवेशयोग्‍य करण्‍यात यावा म्‍हणून या समूहातील सदस्‍य प्रयत्‍न करणार आहेत. जे लोक या मोहिमेत सहभागी होणार आहेत, त्‍यांना त्‍यांनी केलेल्‍या कामासाठी बक्षीसही देण्‍यात येणार असल्‍याची संकल्‍पना ड्रॅगने राबविली आहे. 
राज्‍यात दिव्‍यांगांना प्रत्‍येक ठिकाणी फिरता यावे, प्रत्‍येक ठिकाण त्‍यांच्‍यासाठी प्रवेशयोग्‍य असावे म्‍हणून समाजातून आणि सरकारमधून अत्‍यंत कमी प्रयत्‍न होताना दिसून येत आहेत. त्‍यामुळे आता दिव्‍यांग बांधवांसाठी आपणच प्रयत्‍न करायला हवेत, या भावनेतून ही मोहीम हाती घेण्‍यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पादचारी मार्ग, रस्‍ते, कार्यालये, बँका, सरकारी कार्यालये ही दिव्‍यांगांना फिरता येतील, अशा दृष्‍टीने तयार करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे. ड्रॅग ही संस्‍था ही मोहीम ४ जानेवारी २०२० रोजी राबविणार असून या संदर्भात काही सूचना अथवा सल्‍ले असल्‍यास संस्‍थेला ऐकायला आवडतील, अशी माहिती सदस्‍यांनी दिली. 
 
 

संबंधित बातम्या