काणकोणात अधिकाऱ्यांसाठी पेयजल

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

किमान सेवा बजावताना त्यांना स्वच्छ व सुरक्षित पेय जल मिळावे यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.या पूर्वी परिवारातर्फे सरकारी सेवकांना पेय जलाबरोबरच शीत पेयाचा पुरवठा करण्यात आला होता

सुभाष महाले

काणकोण

काणकोण कॉग्रेस परिवारातर्फे काणकोणात महामारीविरूद्ध लढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याना पेयजलाची सोय करण्यात आली आहे. ऑक्सीरिज कंपनीचे पेय जल तालुक्यातील सरकारी अस्थापने, वीज कार्यालय, पोलिस,अग्निशमन केंद्र,काणकोण पालिका कार्यालय त्याचप्रमाणे पोळे तपासणी नाक्यावर चोवीस तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पाणी पुरवठा कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, महादेव देसाई व माजी जिल्हा पंचायत सदस्य यांनी यासाठी कार्यकर्त्यांना सहकार्य केले आहे.लॉकडाऊन काळात काही सरकारी कर्मचाऱ्यांना दुपारच्या वेळी जेवणाची मारामार होत आहे त्यासाठी किमान सेवा बजावताना त्यांना स्वच्छ व सुरक्षित पेय जल मिळावे यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.या पूर्वी परिवारातर्फे सरकारी सेवकांना पेय जलाबरोबरच शीत पेयाचा पुरवठा करण्यात आला होता असे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी सांगितले. सायमन फर्नाडीस, प्रलय भगत,मिथील च्यारी,नवदिप फळदेसाई, सर्वानंद कोमरपंत,रजत च्यारी, ओमकार कोमरपंत,वैभव भट,सिरिल रिबेलो, चेतन भंडारी, सुरज पागी,कायतान मोंतेरो,जेसन फर्नाडीस, विलियम आल्फान्सो जोनास पिंटो  या कॉग्रेस कार्यकर्त्यांनी पेयजल वितरणासाठी सहकार्य केले.

 

संबंधित बातम्या