मडगावात २२ लाखांचे अमली पदार्थ जप्‍त

मडगावात २२ लाखांचे अमली पदार्थ जप्‍त

पणजी

 पुष्कर (राजस्थान) येथून गोव्यात अमली पदार्थांचा व्यापार करण्यासाठी आलेल्या आंतोनिओ मान्युएल फारिया रामोस या पोर्तुगीज नागरिकाकडून पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २२ लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. कोकेन, एमडीएमए, चरस आदींचा त्यात समावेश आहे. या पथकाने मडगाव रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतोनिओकडून १०१ ग्रॅम एमडीएमए, ११० ग्रॅम कोकेन आणि २४० ग्रॅम चरस जप्त केला आहे. या सर्व अमली पदार्थांची किंमत २२ लाख ४० हजार रुपये आहे. खात्रीलायकरीत्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसानी काल रात्री उशिरा मडगावच्या रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई केली.
संशयावरून हटकले आणि...
पोलिसांनी संशयावरून ४२ वर्षीय आंतोनिओला हटकले, त्याची झडती घेतल्यावर पोलिसांना अमली पदार्थांचा हा साठा सापडला. हे अमली पदार्थ त्याने सोबतच्या बॅगेत लपवले होते. तपासादरम्यान नववर्ष स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्यांना या अमली पदार्थांची विक्री करण्याचा आपला इरादा होता, असे त्याने सांगितले. याप्रकरणी उपनिरीक्षक रोहन मडगावकर हे पुढील तपास करत आहेत.
गोव्‍याला तिसऱ्यांदा भेट
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आंतोनिओने हा देशभरातील पर्यटनस्थळांना भेट देत असतो व गोव्यातील ही त्याची तिसरी भेट असल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सुदेश वेळीप, सिताकांत नायक, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, प्रितेश मडगावकर, अरुण देसाई, सहायक उपनिरीक्षक सत्यवान नाईक, पोलिस शिपाई मंदार नाईक, नितेश मुळगावकर, सुशांत पागी, लक्ष्मण म्हामल, रुपेश कांदोळकर, अमोल नाईक, धीरेंद्र सावंत, परेश गावकर, सदाशिव परब, मयूर गावडे, देवानंद परब, न्हानू हरमलकर, प्रसाद तेली, चालक अनंत राऊत व कुंदन पटेकर यांनी ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com