मोगरी उत्पादकांना बसणार आर्थिक फटका

Dainik Gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी प्रियकर मेलबर्न रॉड्रिग्ज (वय २२, माझीलवाडा - बाणावली) याला अटक केली असून मृत युवती जेनिफर गोन्साल्वीस (२४, कोंब - मडगाव) हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी मोंतहिल- बाणावली येथील परिसरात घडली होती.

पणजी, 

लईराईचा जत्रोत्सव हा संपूर्ण गोव्याचा उत्सव. गोव्यातील प्रत्येक गावात तिचे भक्त, धोंड. लईराई मातेला मोगरा अत्यंत प्रिय. तिच्या जत्रेत या मोगरीच्या कळ्याला अनन्य साधारण महत्व आहे. धोंडांच्या काठीला बांधायला, गळ्यात घालायला, होमकुंडात, देवळात आणि देवीचा कळस तर फक्त मोगरी आणि कुड्याच्या फुलांनी सजवलेला असतो. तिच्या जत्रेच्या ५ दिवसात मोगरीच्या कळ्यांचीच लाखांची उलाढाल होते. त्यामुळे फक्त जत्रेसाठी विकायला गोव्यातील कित्येक लोक, शेतकरी मोगऱ्याचे पीक काढतात. पण यावर्षी जागतिक महामारी आणि टाळेबंदीमुळे देवस्थान समितीने जत्रा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक व्यवसायांना धक्का पोहोचला आहे. यात मोगरा उत्पादक आणि विक्रेत्यांना बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
गोव्यातील अनेक लोक जत्रेत विकण्यासाठी मोगरा फुलवायचे. नंतर मग त्यांच्या माळा करून जत्रेत ५०-६० रुपयाला एक माळ विकली जायची. एका माळेत २५-३० मोगरीचे कळे असायचे. माशेल तसेच बार्देश तालुक्यात अनेक ठिकाणी किती तरी लोक आपल्या घरात असलेली मोगरी जत्रेसाठी फुलवतात.

‘एवढ्या मोगरी उत्पादनाचे करायचे काय?’
सोमनाथ पोळे, खोर्जुवे येथील रहिवासी यांचे १२०० स्क्वेअर मीटरचे शेत असून तेथे ते वर्षभर मोगरीचे पीक काढतात. जी वेगवेगळे फुल विक्रेत्ये विकत घेतात. त्यांनी सांगितले की जत्रेच्या दिवसात त्यांना जवळ जवळ ५०,००० रुपयांचा नफा होतो. एरव्ही जत्रेच्या दिवसात मोगरीची खूप विक्री व्हायची, पण आता जत्राच होणार नसल्याने एवढ्या मोगऱ्यांचे करायचे काय? सगळी मोगरी वाया जाते. माझ्याकडे ८ महिला कामाला येतात. त्या या दिवसात फक्त मोगरी करण्याच्या आणि गुंफण्याचे मिळून ७-८ हजार कमवाची. यावर्षी सगळे नुकसानच आहे.
गावात इतर कितीतरी लोक या दिवसात त्यांच्या घरात असलेली मोगरी फुलवायचे. पाडव्या दिवशी मोगरी खुटली (जुनी पाने काढून टाकणे) जायची, पण देवस्थान समितीने जत्रा होणार नसल्याचे सांगितल्याने कुणीच तयारी केली नसल्याचे ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या