‘कोरोना’ बाबत आपत्कालीन सेवा चिखली उपजिल्हा इस्पितळात सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

मुरगाव: चीनमध्ये फैलावलेल्या कोरोना रोगाची लागण झालेला एक रुग्ण गोव्यात सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. याची दखल घेऊन आपत्कालीन सेवा पुरविण्यास आरोग्य खाते सज्ज झाले आहे.त्या अनुषंगाने दाबोळी विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली उपजिल्हा इस्पितळात अशा रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी विशेष सोय केली आहे. त्यासाठी इस्पितळात दोन खोल्याही आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

कोरोना रोगाचा जगाने धसका घेतला आहे.गोव्यात दोन दिवसांपूर्वी या रोगाची लागण झालेला एक संशयित आढळून आल्याने गोव्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे.राज्य सरकारने याबाबत कोणताच धोका पत्करायचा नाही असे ठरवून आरोग्य खात्याला अधिक जागरुक राहण्याचे आदेश दिले आहे.त्यानुसार आरोग्य खात्याने चिखली उपजिल्हा इस्पितळात रुग्णांच्या सेवेसाठी खास उपाययोजना आखल्या आहेत.
 
संबंधित बातम्या