यांनी केला पुण्याचा दौरा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

अभियांत्रिकीच्‍या विद्यार्थ्यांचा पुण्यात शैक्षणिक दौरा

पुणे शहराच्या शैक्षणिक दौऱ्यावर गेलेले फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक.

फातोर्डा : येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५० विद्यार्थी पुणे येथे शैक्षणिक दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत प्रो. सत्येश काकोडकर, प्रो. स्टेरिना डायस, प्रो. मधुराज नाईक आणि प्रो. अक्षता कुडचडकर गेले होते.

या विद्यार्थ्यांनी पुण्यात सेंट्रल वॉटर ॲण्ड पावर रिसर्च स्टेशन, मिलिटरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, प्लंम्बिंग लेबोरटरी (कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे) आणि पाटील लाईफ रिपब्लिक कन्‍स्ट्रक्शन साईट येथे भेट देऊन विशेष माहिती मिळवली.

सेंट्रल वॉटर ॲण्ड पावर रिसर्च स्टेशन हे केंद्र सरकारच्या जलस्त्रोत मंत्रालयाच्या अधिकारात येते. येथे ओप्टिमाईझिंग डिझाईन ऑफ रिव्हर, कॉस्टल, वॉटर स्टोरेज आणि हायड्रोलिक स्ट्रक्चर याचे नियोजन, आयोजन व संशोधन केले जाते. या भेटीत वैज्ञानिक बिलाल शेख, संशोधन सहाय्यक मिलनकुमार सोमेश्र्वर व राहुल मलिक यांनी मार्गदर्शन केले.

प्लम्बिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रदीप जगताप यांनी प्लम्बिंगचे महत्त्‍व विषद केले. वैष्णव वाल्मिकी, चेतन आपटे व राहुल साकोरे यांनी काही प्रयोग करून दाखविले. मिलिटरी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी खास डिझाईनच्या इमारतींची पाहणी केली. यावेळी मयनक हझरा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
कोलते-पाटील बांधकाम साईटवर विद्यार्थ्यांना प्रविण महाजन, यतिन पाटील, युवराज लोंढे, पंकज चौधरी, मानस प्रधान यांनी बांधकामविषयक माहिती दिली.

 

 

पेन्ह दि फ्रांक ग्रामसभा

संबंधित बातम्या