Chief_Minister_of_Goa,_Shri_Pramod_Sawant
Chief_Minister_of_Goa,_Shri_Pramod_Sawant

पर्यावरणवाद्यांनी सरकारचे प्रकल्प बंद पाडले

फातोर्डा:पर्यावरणवाद्यांनी सरकारचे अनेक विकास प्रकल्प बंद पाडले.मोप विमानतळ २०२२ पर्यंत पूर्ण होणार.पर्यावरणवाद्यांनी सरकारचे अनेक विकास प्रकल्प बंद पाडले, असा आरोप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्यातील एक आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पास मान्यता दिल्याने आता हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार असा विश्र्वासही मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला. मोप येथील विमानतळ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्यामुळे गोव्याच्या विकासास हातभार लागणार आहे. शिवाय गोमंतकीय तरुणांसाठी नोकऱ्यांचे दरवाजे खुले होतील असेही डॉ. सावंत म्हणाले.
रौप्य महोत्सवी गोवा युवा महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोव्याला नेतृत्वाची गरज केवळ राजकीय क्षेत्रात नसून सामाजिक व आर्थिक क्षेत्रांमध्येही गरज भासते.
गोव्याचे पर्यावरण जपण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून सर्व गोमंतकियांची आहे. युवकांनी हे आव्हान स्वीकारावे असेही ते म्हणाले.
मी टिकेला भीत नाही
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे सरकाराच्या कारभारावर बरे-वाईट बोलण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मी टिकेला भीत नाही. आपले सरकार ऐकणाऱ्यांचे आहे. मी गोव्याच्या हितासाठी कार्यरत आहे. कुठलीही टीका मी सकारात्मक नजरेने पाहतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोकणी अस्मिता जपावी
गोवा ही उत्सवी भूमी आहे. गोव्यामध्ये कोणाचेही स्वागत करण्यास गोवेकर तत्पर असतात.गोवेकरांनी येथील परंपरा व संस्कृति जपून ठेवावी. जर कोकणी अस्मिता जपली तर गोवा आजच्या युगात टिकाव धरू शकेल. कोकणी भाषेचे काम जास्त जोमाने व्हायला पाहिजे. येथील पत्रव्यवहार व लेखन कोकणीतून व्हायला पाहिजे, तरच कोकणीला राजाश्रय मिळणे शक्य होईल. ही जबाबदारी कोकणी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवा महोत्सव हा युवकांचा उत्सव असून त्यांनी आपला जोश, उमेद येथेच भागवावी असे आवाहनही त्यांनी केले.

अनपेक्षित​:आयआयटी कर्मचाऱ्यांना बोलण्यास मज्जाव
राजभाषा संचालनालयाला लवकरच पूर्ण वेळ संचालक
१९९७ पासून जरी राजभाषा संचालनालयाची सुरवात झाली तरी या खात्याला खरा न्याय दिला तो २०१२ साली तेव्हाचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी.या खात्याला लवकरच पूर्ण वेळ संचालक मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com