इवनिंग गाउन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

फॅशन: इवनिंग गाउन (पार्टी वेअर)

फॅशन: इवनिंग गाउन (पार्टी वेअर)

सध्या चलती आहे ती गाउन पूर्णपणे अंग झाकणारा पण दिसायलाही सुंदर असा पेहराव ज्याला गाउन म्हणतात किंवा इवनिंग गाउन, किंवा पार्टी साठीचा पेहरावही म्हणतात. हा सिल्क किंवा सॅटिन मटेरियल किंवा छिफॉन मटेरीयल पासूनही बनवता येतो प्रत्येकाच्या आवडीनुसार कपडा वापरायचा.
पायघोळ पेहराव वापरला तर आपण साडी वापरणाऱ्यांना पण एक चांगला पर्याय. ज्यात आपण चारचौघांत अजूनही दिसू शकतो आपल्या व्यक्तिमत्त्वात बऱ्यापैकी फरक पडतो. त्यालाच अनुरूप हेअर स्टाईल ऍक्‍सेसरीज, वापरल्या तर आपण त्या पेहरावाला अजून उठावदार बनवू शकतो. पण हयात जर उंच महिलावर्ग असेल तर त्याला जास्त घेर शोभून दिसतो. आणि जर आपण बुटक्‍या असू तर जरा निमुळता घेर किंवा मग रू लाइन मध्ये मोडणारा पॅर्टन छान दिसतो.
हा इवनिंग गाउन पार्टी, किंवा फॉर्मल वेअर म्हणूनच चांगला. रोजच्या किंवा कार्यालयीन वापरासाठी अजिबात चालणारा नाही. त्यासाठी तो हॅवी वर्क केलेला असतो किंवा त्यासाठी वापरलेलं कापड हे खूप महागडं असतं लग्नसमारंभासाठी आपण खास असे गाउन. आपल्या पद्धतीने डिझाईन केले तरी चालतात. यात, गोल्ड सिल्वर, मरून, चॉकलेटी निळा गडद रंग खूपच शोभून दिसतात. आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार गळ्याची डिझाईन निवडावी ज्यात डीप नेक, हॉल्टर नेक, बोट नेक इत्यादी नेक डिझाईन खूप सुंदर दिसतात. फक्त नेकलाईनवर छान जरीवर्क किंवा एम्ब्रॉयडरी करून त्याची आकर्षकता वाढवू शकतो. एम्ब्रॉयडरी पण नाजूकच असावी अति काम त्या गाउनच बॅलन्स बिघडवू शकतो. फक्त जर 'नवरी मुलीसाठी जर आपण गाउन डिझाईन करत असू तर त्यावर 'हेवी वर्क' करायला काहीच हरकत नाही. पण इतरांसाठी कमी काम पण आकर्षक दिसणाऱ्या अशाच डिझाईन.
आपण जर इवनींग गाउन वापरणार असू तर त्यासाठी योग्य त्याच दागिन्यांची निवड करावी. साडीवर कसे वेगवेगळ्याप्रकारचे दागिने वापरता येईल. तसे दागिने गाउनसाठी चालणार नाही. एकच नाजूक नेकलेस किंवा मग डायमंड ज्वेलरी खूपच शोभून दिसेल. काही मुली गाउनवर हॅवी डिझाईन असला की ऍक्‍सेसरीज वापरणे टाळतात. त्यामुळे गाउनच महत्त्व टिकून राहतं. गाउन हा इंडो वेर्स्टन आउटफिट असल्यामुळे त्याच्यावर हलकेच दागिने शोभतात. हातात एक किंवा दोनच बांगड्या किंवा मग ब्रेसलेट.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळा रंग जर तुम्हाला आवडत असेल तर असा काळा गाउन खूपच सुंदर दिसतो. रात्रीच्यावेळेस असा गाउन निवडावा. पार्टीत सगळ्यांच्या नजरा अशा गाउन वर टिकतात. ज्यावर फक्त थोडंच वर्क आणि एखादा स्टोल घेतला तर खूपच छान. कायम अशा पेहरावावर उंच टाचांचीच पादत्राणे वापरावीत कारण घेरदार आणि लांब असा पेहराव असल्याने ती शोभून दिसतात. खूप सुंदर सुंदर गाउन बाजारात उपलब्ध आहेत. महिलावर्गांनी पार्टीसाठी म्हणून असे गाउन निवडल्यास काहीच वावगं नाही. आणि हे गाउन कॅरी करण पण सहज शक्‍य होत. आपण काहीतरी वेगळं घालायचय असे प्रत्येकाच्या मनात असते मग आपण गाउनची निवड करू शकतो. त्यावर खूप दागिने घालायची पण गरज नसते. मोजकेच दागिने. हो पण या गाउनला कापड हे महागडं लागत. म्हणून ह्या गाउनची किमंत जास्त असू शकते. आपण कोणत्या समारंभासाठी गाउन वापरणार त्यांच्यावरूनच आपण किंमत किंवा आपले बजेट ठरवायचा आणि या पद्धतीने गाउन डिझाइन करायचा. चला मग असा हा एकतरी 'गाउन' आपण वापरून बघुयात.

संबंधित बातम्या