धर्म, जात पात न बघता मतदान ही गोव्यासाठी अभिमानास्पद गोष्ट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः गोवा हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. येथील लोक जातपात अथवा धर्म बघून कधीच मतदान करीत नाहीत ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यांनी भविष्यातही अशी सवय लावून घेऊ नये. लोकशाहीच्या रक्षणासाठी सुट्टीच्या दिवशी सहलीला न जाता सर्वांनी मतदानाचा हक्क पार पाडावा, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले.

पणजीः गोवा हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. येथील लोक जातपात अथवा धर्म बघून कधीच मतदान करीत नाहीत ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यांनी भविष्यातही अशी सवय लावून घेऊ नये. लोकशाहीच्या रक्षणासाठी सुट्टीच्या दिवशी सहलीला न जाता सर्वांनी मतदानाचा हक्क पार पाडावा, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कला अकादमीत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक अधिकारी उत्तर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यायसोबत व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आर. के. श्रीवास्तव, मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत व मान्यीवर उपस्थित होते.

बाहेर राज्यातील तुलनेत गोव्यात मतदानाबाबतची स्थिती खूप चांगली आहे. येथील लोकांमध्ये मतदानाबाबत चांगल्या प्रमाणात जनजागृती आहे. मुंबईसारख्या  ठिकाणी मतदाराला मतदानासाठी नेण्यााचे काम संबंधित पक्षाचे कार्यकर्ते करतात. मतदाराला आपली जबाबदारी लक्षात आली असती, तर ही वेळ आली असती का, असा प्रश्‍‍नही यावेळी राज्यपालांनी विचारला.

कित्येक वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी पाठिंबा दिला आणि मी तेथे निवडणूक घेण्याचा चंग बांधला. तेथे स्थानिक निवडणुका घेतल्या, तर पार्थिवांचा सडा पडेल, अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त. केल्याा जात होत्या. मात्र, या निवडणुका पार पडल्याावर एक चिमणीसुध्दा् मेली नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातील राज्यांमध्ये एका प्रधानाला पंचायतीच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. यामुळे निवडणुकीची पवित्रताच संपली असून समाजाने या विरोधात लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

गतवर्षी मतदारयादी तपासणी कार्यक्रमाची संकल्पना भारतीय निवडणूक आयोगाने अंमलात आणली आणि यासंदर्भात गोव्याने अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांत पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर आणि विशेष व्यक्तींसाठी मतदान केंद्र प्रवेशायोग्य बनवणे या दोन गोष्टीला महत्त्व देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते व समाजकल्याण खात्याच्या साहाय्याने प्रत्येक मतदान केंद्र प्रवेशायोग्य बनवण्याचा विडा उचलला होता व त्यानुसार प्रत्येक केंद्रात व्हीलचेअर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मुख्या निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली.

यावेळी राज्यपाल व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार, बक्षिसे व गौरव करण्यात आले. येत्या १५ मार्चला होणाऱ्या जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावण्याचे आवाहन श्रीवास्तव यांनी केले. महिला आणि बाल कल्यााण खात्याच्या सचिव दीपाली नाईक यांनी उपस्थितांना मतदानाचे महत्त्वप पटवून देणारी प्रतिज्ञा दिली.

टपालाद्वारे मतदानाची सोय
१९५० साली भारतीय निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. २००० साली ईव्हीएमने प्रवेश केला आणि २०११ सालापासून राष्ट्रीय मतदारदिन साजरा करण्यात येऊ लागला. २०१३ नन ऑफ अबॉव्हल (नोटा) पर्याय देण्यात आला. २०१७ साली व्हीव्हीपॅट आले आणि २०२० सालापासून विशेषांगी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी टपालाद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आल्याटची माहिती राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी दिली.

संबंधित बातम्या