डोळ्यांचे व्यायाम आणि चष्म्याचा नंबर

अनिरुध्द जोशी
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

डोळ्यांचे व्यायाम आहेत आणि त्यांनी डोळ्यांचा नंबर कमी होतो.

१८६० साली अमेरिकेत जन्मलेल्या डॉ विल्यम होराशिओ बेट्स या डॉक्टरनी असा सिध्दांत मांडला की डोळ्यांना होणाऱ्या ताणामुळे डोळ्यांचा नंबर वाढतो व त्यांनी सांगितलेल्या ताणमुक्तीच्या व्यायामामुळे तो नंबर कमी होतो. डॉक्टर बेट्स नंतर फार कमी लोकांनी त्यांच्या सिद्धांताला दुजोरा दिला, त्यामुळे त्यांनी सांगितलेले डोळ्यांचे व्यायाम प्रचलित झाले नाहीत.

अनुभव समाजसेवेचे : डोळ्यांचे व्यायाम आहेत आणि त्यांनी चष्म्याचा नंबर कमी होतो. श्री अरविंद आश्रम पाँडेचेरी येथे १९६९ साली सुरू झालेली एक डोळ्यांची संस्था आहे. “स्कूल ऑफ परफेक्ट आय साईट” असे या संस्थेचे नावं आहे. या संस्थेला सोमवारी सुट्टी असते.

७ वर्षावरील आणि ४० वर्षापेक्षा कमी वयाच्या कुठच्याही माणसाला या शाळेत ७ दिवसांकरता प्रत्येक दिवशी सकाळी एक तास व दुपारी एक तास मोफत प्रत्येकाच्या डोळ्यांचे निदान करून त्याच्या जरुरीप्रमाणे व्यायाम शिकवले जातात ज्याच्या नियमित सरावामुळे बऱ्याच लोकांच्या डोळ्याचा नंबर कमी झालेला आहे. माझे एक ६५ वर्षाचे स्नेही प्रोफेसर जे पुण्यात कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत डोळ्यांचे व्यायाम करून एकदाही चष्मा वापरलेला नाही.

डॉक्टर रघुबीर शरण अगरवाल हे प्रख्यात आध्यात्मिक गुरु श्री अरविंद यांचे थोर अनुयायी होते. ते अॅलोपॅथिक डॉक्टर होते. त्याप्रमाणे डॉक्टर म्हणून लोकांची सेवा करताना ते निसर्गोपचाराकडे वळले. त्यामुळे त्यांनी योग व डॉक्टर बेट्स यांच्या सिद्धांताचा अभ्यास केला. त्यांनी “माइंड अंड विजन” व “योग ऑफ परफेक्ट साईट” हे दोन अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. ५ मे १९६८ मधे त्यांनी पाँडेचेरी येथे “स्कूल ऑफ परफेक्ट आय साईट” हे डोळ्यांवर संशोधन करणाऱ्या संस्थेची स्थापना केली.

याशाळेत तुम्हाला पूर्वसूचना देवून, त्यांनी दिलेल्या दिवशीच जाता येते. इथे मुलाखतीला वेळ मिळवणे हे महा कठीण काम आहे. 2A, Lally Tolendal Street, Pondicherry 605 001 हा या संस्थेचा पत्ता आहे. दुरध्वनी : (०४१३)२२३३६५९, Email: auroeyesight@yahoo.com ही त्यांची संपर्क करण्याकरता लागणारी इतर माहिती आहे. दहा वर्षाखालील मुलांबरोबर एका पालकाने जावे, असे सांगण्यात येते. प्रत्येकाला एक टेनिसबॉल व सुती रुमाल घेऊन बोलावले जाते. ज्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांना एक वर्षानंतर बोलावले जाते. या संस्थेची जाहिरात कुठेच होत Eye Exercises That Can Improve Your Visionनसल्यामुळे ज्यांना या संस्थेच्या व्यायामामुळे फायदा झाला आहे, त्यांच्याकडूनच या संस्थेची माहिती पसरते.

डोळ्यांना ते नेहमी न मिचकावल्यामुळे खूप ताण येतो. असा ताण हा आपण कॉम्पुटर, मोबाईलचा जास्त वापर केल्याने वाढतो. वाफ, सूर्यप्रकाश, थंड पाणी आणि आपले तळहात यांचा उपयोग डोळ्यांच्या व्यायामामध्ये डोळ्यांना आराम पोचवण्याकरता केला जातो. वेगवेगळ्या खेळातून डोळे नियमित वेळाने उघडझाप करण्याची सवय ही संस्था लावते. याविषयी अधिक माहिती जिज्ञासूंना वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळावरून अथवा संपर्क करून मिळवता येईल.

केंद्र सरकार करणार आयडीएसए चे नामांतरण

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर