अहो सांगा आम्ही कसे जगायचे ? सांगा ना .!  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वाळपई: शेतकरी धास्‍तावले; कर्जाचा विळखा वाढतोय!

वाळपई: शेतकरी धास्‍तावले; कर्जाचा विळखा वाढतोय!

सत्तरी तालुक्‍यातील सुपारी फळे आजपर्यंत खेत्यांनी नुकसानीत केली नव्हती. पण यावर्षीपासून खेती यांच्‍याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. सुपारी फळांच्या घोसावर बसून कच्ची सुपारी पाडत आहेत. तसेच सुपारीची वरची साल कुडतरून नुकसान करीत आहेत. नारळ पिकाला पाणी देणे, खते देणे ही कामे करावी लागतात. पण, आता खेती, शेकरा या प्राण्यांनी नारळ पिकाला लक्ष्य केले आहे. कोवळी नारळ फळे नुकसान करीत आहे. बागायतदारांनी या नुकसानीचा धसका घेतला आहे. वार्षिक मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने कर्ज फेड करणे कठीण होते आहे. शेती, बागायती कामांसाठी घेतलेली बँकांची कर्जे कशी फेडायची ही चिंता बनली आहे. या एकूण परिस्थितीमुळे शेतीचे व्यवस्थापनाचे वेळापत्रक बिघडले आहे. उपद्रवी प्राण्यांच्या सतावणुकीमुळे आताचा शेतकरी वर्ग नवीन प्रयोग करण्यास धाडस करीत नाही, असे चित्र आहे. जंगली प्राण्यांना सुरक्षाकवच व मनुष्याला मात्र काहीही उपाययोजना नाहीत.

नुकसानभरपाई पर्याय नव्हे...
शेती, बागायतीची नुकसानी झाली की सरकारतर्फे नुकसान भरपाईची भाषा केली जाते.पण, ही नुकसानी वेळेत मिळते अशी नाही. केवळ नुकसानीची भाषा योग्य पर्याय ठरणार नाही.कष्टकरी लोकांनी केलेल्या कष्ट मेहनतीचे काय? शेतकरी किंवा बागायतदार जमिनीतून धान्य उगवून पोटापाण्याची व्यवस्था करीत असतो. त्याचे योग्य फळ मिळाले पाहिजे. पण उपद्रवी प्राण्यांमुळे होणारे नुकसान बघवत नाही.कुळागरात राशीच्या राशी, नारळ फळाच्या पडलेल्या पहावयास मिळतात. त्याची नुकसान भरपाई दिली जात काय? हा संशोधनाचा विषय आहे. नारळ फळे नष्ट करणे दररोज सुरू असते. मग दररोज लोकांनी नुकसानीसाठी शेतकी खात्यात खेपा माराव्यात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणूनच प्रत्येकवेळी नुकसान भरपाई हा पर्याय राहणार नाही. त्यासाठी वन्यप्राण्यांना जंगलात रोखणे हा पर्याय राहणार आहे.त्याची नैतिक जबाबदारी वनखात्याची आहे. पण वनखाते याबाबत कोणतीही उपाययोजना करीत नाही.केवळ जंगलात कॅमेरे बसविले म्हणजे काम नव्हे. त्यासाठी जंगलातील प्राण्यांना अन्न तयार होईल यासाठी कार्यवाही हाती घेतली पाहिजे होती. त्याकडे मात्र अक्षम्यपणे वनखाते दुर्लक्ष करीत आहे.

रेती काढणाऱ्यांविरोधात कडक कारवाई

केवळ सल्लाच, कृती शून्‍य...
जंगलातील प्राणी एकमेकांवर अवलूंबन असतात. पण ती साखळीच तुटल्याने पट्टेरी वाघांसारखे प्राणी लोकवस्तीत येत आहेत. तुमची पाळीव जनावरे मेली तरी चालेल पण वन्यप्राणी मारू नका, असेच सांगितले जाते. काजू बागायतीतदेखील खेतींचा उच्छाद सुरू असतो. काजू झाडांवर उड्या मारून कोवळे काजूगरांचे नुकसान केले जात आहे.काजू बागायतीत काजू हंगामाअगोदर बेणकट (सफाई) करावी लागते.त्यासाठी बराच खर्च येतो. पण उत्पन्न घटल्याने अर्थकारणाचा ताळमेळ बिघडलेला आहे. आर्थिक गणित बदलले असल्याने कामगार ठेवणे कठीण होऊन बसले आहे. सत्तरीत काजू, भात, केळी, अननस, नारळ, सुपारी मिरी अशी पिके घेतली जातात. त्यात काजू पीक जवळपास ७० ते ७५ टक्के घेतले जाते.सुपारी पीक घेणारेही ग्रामीण भागात लोक आहेत. अनेक नवीन बागायतदार कुळागर वसविणारे तयार होत आहे.भात पीकाला आता पारंपरिक पध्दतीने सिंचन न करता तुषार, ठिबक सिंचन पध्दतीचा वापर केला जातो.यासाठी वीज यंत्रणेचा खर्च उचलला जातो. पण सध्‍याच्या परिस्थितीत खर्च करून हाती काहीच मिळत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.

संबंधित बातम्या