या मार्गावर जलद फेरी सुरु होणार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

पणजी-वास्को मार्गावर जलद फेरी : लोबो

पणजी आणि वास्को जलदफेरी केव्हा सुरू होईल, या प्रश्‍नावर उत्तर देताना लोबो यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. अशा व्यवसायात जे गोव्यातील लोक गुंतवणूक करू शकतात, त्यांचे आम्ही पहिल्यांदा स्वागत करू करतो.

पणजी : पणजी ते वास्को अशी जलद फेरी चालू करण्याचे आम्ही ठरविले असून, ते करणारच आहोत. चारचाकी, दुचाकी आणि प्रवासी घेऊन जाणारे जलदगतीची फेरी या मार्गावर असेल. त्यासाठी केंद्राची आम्ही मदत घेणार असून, या व्यवसायासाठी गोव्यातील स्थानिक या व्यवसायात गुंतवणूक करू पाहतात त्यांचे आम्ही पहिल्यांदा स्वागत करू, असे मत बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

वास्को ते पणजी हा जलमार्ग जोडण्याचे काम जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर आम्ही करणार आहोत. ते पुढे म्हणाले की, या तरंगत्या जेटीला कोणतेही बांधकाम करावे लागत नाही. दोन तासांत ही जेटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हटविता येते.

राज्यात ज्या ठिकाणी छोट्या नद्या आहेत, त्याठिकाणी तरंगत्या जेटींचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याशिवाय ज्या भागात अरुंद रस्ते आहेत, त्याशिवाय तेथून नद्या वाहत आहेत, अशा ठिकाणी जेटींचा वापर करणे शक्य आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जलमार्ग प्राधिकरणातून या जेटी उभारल्या जात आहेत. शंभर ते एकशे वीस लोकांना फेरीद्वारे प्रवास करण्याकरिता या जेटींचा वापर करता येऊ शकतो.

 

संबंधित बातम्या