प्रजासत्ताकदिनीचे उपोषण तूर्तास स्‍थगित

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पेडणे:पेडणे बसस्थानकामध्ये आंतरराज्य बसेसना थांबा देण्‍याची मागणी

पेडणे:पेडणे बसस्थानकामध्ये आंतरराज्य बसेसना थांबा देण्‍याची मागणी

आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या प्रवाशी बसेस पेडणे बसस्थानकात न येता परस्पर मालपे येथून प्रवाशी वाहतूक करतात त्यामुळे पेडणे व परिसरातील प्रवाशांना नाहक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.यासाठी प्रजासत्ताकदिनी जाहीर करण्यात आलेले उपोषण संबंधितांच्या आश्वासनानंतर सध्‍या स्थगित ठेवण्यात आले आहे.
पेडणे हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बहुतेक सरकारी कार्यालये पेडण्यातच आहेत.म्हापसा, पणजी सारख्या ठिकाणाहून येणाऱ्या परराज्यातील प्रवाशी बसेस, विशेषतः कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले सारख्या काही एस. टी. गाड्या पेडणे शहरात येतात, परंतु सुसज्ज बसस्थानकात न जाता परस्पर बाहेरुनच पणजी, म्हापसा, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे जातात. तसेच पुणे, कोल्हापूर, देवगड, गणपतीपुळे, शिर्डी, उस्मानाबाद या बस गाड्या पेडणे शहरात पर्यायाने पेडणे बसस्थानकात थांबा न घेता परस्पर मालपे येथे प्रवाशांना उतरवतात व राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवाशी वाहतूक करतात.त्या सर्व बस गाड्यांना पेडणे बसस्थानकात थांबा देण्यात यावा, याकरिता जगन्नाथ पांडुरंग पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी सरकारी संकुल, पेडणे येथे उपोषण करण्याचे निश्चित केले होते.त्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी, उत्तर गोवा, पणजी यांना आणि त्या निवेदनाच्या प्रती उप-मुख्यमंत्री बाबू आजगावकर, आमदार दयानंद सोपटे, उपजिल्हाधिकारी, पेडणे, मामलेदार, पेडणे, पोलिस निरिक्षक, वाहतूक संचालक, पणजी आणि वाहतूक निरीक्षक पेडणे यांना देण्यात आले होते.त्‍यानंतर ता. २० रोजी सहाय्यक वाहतूक संचालक, उत्तर गोवा, पेडणे यांच्याशी जगन्नाथ पंडित, अॕड. गौरेश जोसलकर, चंद्रकांत जाधव व आनंद एम. नाईक यांची चर्चा झाली व आपल्या अडचणी विषद केल्या.सहाय्यक वाहतूक संचालक, पेडणे यांनी हा प्रश्‍‍न आंतर राज्य असल्याने कदंब महामंडळाशी सल्लामसलत करुन हा गुंता सोडविण्याचे लेखी आश्वासन २० जानेवारी रोजी दिल्याने प्रजासत्ताक दिनी २६ रोजी करण्यात येणारे लाक्षणिक उपोषण स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 

 

वित्त आयोगाकडे मागितले महापालिकेने ५०० कोटी

संबंधित बातम्या