फातोर्डा सामुदायिक शेतीची फाईल गायब

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

विजय सरदेसाई यांच्या आरोपानंतर आरोपाचौकशीची करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

फाईल गायब झाली असेल तर त्याची चौकशी करायला हवी अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पणजी:  कृषी खात्यातील फातोर्डा व नावेली येथील सामुदायिक शेतीसंदर्भातची फाईल माझे मंत्रिपद काढल्यावर गायब झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले हे खाते आहे. ही फाईल विद्यमान मंत्र्यांनी गायब केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप करून या सामुदायिक शेतीला प्रोत्साहन देण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

राज्यात सुमारे १३ हजार ४०८ हेक्टर जमीन पडिक आहे. या जमिनीचा उपयोग शेती व लागवडीसाठी करण्याच्या हेतूने सामुदायिक शेतीला प्रोत्साहन मी कृषीमंत्री असताना देण्यात आले होते. या पडिक जमिनीत सामुदायिक शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत आमदार सरदेसाई यांनी व्यक्त केले. नावेली येथे सामुदायिक शेतीला सुरवात करण्यात आली आहे. या मतदारसंघातील पडिक असलेले जमिनीचे सुमारे ४०० सर्वे क्रमांक कृषी खात्याला देण्यात आले होते. खात्याकडून या शेतीसाठी निधीही मिळाला नाही. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःहून या सामुदायिक शेतीला सुरवात केली आहे. सुमारे ४ ते ५ लाख चौ. मीटर जमीन या शेतीखाली आणण्यात आली आहे असे आमदार लुईझिन फोलरो यांनी निदर्शनास आणून सरकारने निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.

 

नव्याने पुन्हा फाईल तयार...
या सामुदायिक शेतीसाठीच्या तीन फाईल्स कृषी खात्याकडे होत्या. त्यातील फातोर्डाची फाईल सापडत नाही. ती बेपत्ता झाली आहे व माजी मंत्र्यांनी ती जाताना नेली असण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने पुन्हा फाईल तयार करण्यात आली आहे. फातोर्ड्यातील ४१ शेतकऱ्यांनी या सामुदायिक शेतीसाठी हमी देण्यास तयार नाहीत, असे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी स्पष्ट केले.

 

 

हिंदू नेत्यांची हत्या थांबवा !

संबंधित बातम्या